

Readers and representatives celebrating ‘Sakal’ 24th anniversary at the Snehmelava.
sakal
सोलापूर : संध्याकाळचे प्रसन्न वातावरण, मंगलमय सनईचे सूर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजलेले व्यासपीठ अशा वातारणात ‘सकाळ’चा स्नेहमेळावा उत्साहात झाला. सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर्स क्लबचे मैदान हळूहळू गर्दीने फुलले आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. विचारांचे आदान - प्रदान करत रंगलेल्या या स्नेहमेळाव्यात समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘सकाळ’च्या विविध सामाजिक उपक्रमांसह २४ वर्षांतील योगदानाचे कौतुक करत पंचविशीतील वाटचालीलाही शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘वारसा’ या बहुरंगी, बहुपानी विशेष पुरवणीचे भरभरून कौतुक झाले. तर वाढत्या गारव्यातही रात्री उशिरापर्यंत वाढत गेलेल्या गर्दीत लोकांच्या प्रेमाची ऊब दिसून आली.