esakal | आमदार प्रणितींना वंचितकडून इशारा ! जाहीर माफी मागा अन्यथा आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

praniti-shinde
  • 'वंचित'कडूनआमदार प्रणिती शिंदेंचा निषेध 
  • पोस्टरला मारले जोडे : ऍड. आंबेडकरांवर केली होती टिका 
  • मागासवर्गीय आरक्षणाचा विषय कॉंग्रेसनेच ठेवला प्रलंबित : चंदनशिवे 
  • ऍड. आंबेडकरांची जाहीर माफी न मागितल्यास प्रणिती शिंदेविरुध्द आंदोलन 

आमदार प्रणितींना वंचितकडून इशारा ! जाहीर माफी मागा अन्यथा आंदोलन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सुधारित भारतीय नागरिकत्व कायदा, मागासवर्गीयांच्या आरक्षणावर देशभर आंदोलने होत असताना डॉ. बाबासाहेबांचे रक्‍त कुठे आहे, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर भाषणातून केला. आमदार शिंदे यांच्या या वक्‍तव्याचा निषेध करीत वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चार हुतात्मा पुतळा परिसरात जोडे मारो आंदोलन केले. 

हेही नक्‍की वाचा : आमदार प्रणिती शिंदे म्हणतात...एमआयएम अन्‌ वंचित मोदींचे दलाल 


केंद्र सरकारने केलेला कायदा देशातील मुस्लिमांसह मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असल्याबद्दल वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम आंदोलन केले. दलित, मुस्लीम बांधवांवरील अन्यायाविरुध्द त्यांनी सातत्याने आवाज उठविला. परंतु, कॉंग्रेसच्या माध्यमातून दलित व मुस्लिमांच्या मतांवर खासदार, आमदार झालेल्या शिंदे कुटुंबियांना दलित व मुस्लिमांवरील अन्याय कधी दिसलाच नाही. 2002 मध्ये सोलापुरात हिंदू- मुस्लीम दंगल झाली, खैरलांजी प्रकरणी सोलापूर बंद होते, मॉब लिंचिंगचे अनेक हल्ले झाले, भीमा- कोरेगाव दंगल झाली, तरीही शिंदे कुटुंबियांनी त्यावर भाष्य केले नाही. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना ऍड. आंबेडकरांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नसल्याचे वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ता आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आमदार शिंदे यांनी ऍड. आंबेडकरांची जाहीर माफी मागावी, अन्यथा डॉ. बाबासाहेबांचे रक्‍त त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेस नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, वंचित बहूजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेश्‍मा मुल्ला, अंजना गायकवाड आदी उपस्थित होते. 

हेही नक्‍की वाचा : एसटी अन्‌ जीपची समोरासमोर धडक : पाचजण ठार 

loading image
go to top