दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी न सोडवाल्याने करपुन गेलेली पिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतातील कांदा ,ऊस व इतर पिके जळून चालली आहेत.

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी न सोडवाल्याने करपुन गेलेली पिके

करमाळा: या गावाला दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी राजकीय सुडबुद्धीने व अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे टेल टू हेड च्या नियमाची पायमल्ली करून पाणी नं सोडल्याबद्दल सोमवार ता.9 रोजी कुंभेज फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करणेचा इशारा घोटी, निंभोरे, वरकुटे शेतक-यांनी दिला आहे. या निवेदनावर घोटीचे सरपंच सचिन राऊत, वरकटेचे सरपंच दादासाहेब भांडवलकर, अविनाश वळेकर याच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की,दहिगाव योजनेचे आवर्तन दोन महिन्यापासून सुरू आहे.माञ अद्यापपर्यंत घोटी चारी नं. 6 ,निंभोरेचा काही भाग ,वरकुटे,आळसुंदे या चाऱ्याना पाणी मिळाले नाही.सध्या दोन आर्वतानाचे पाणी सोडलेले आहे, प्रत्येक वर्षी या गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळावे म्हणून आम्हाला अर्ज, विनंती, आंदोलने करावे लागतात. टेल ला पाणी देणे कायद्याने सक्ती असतानाही पूर्ण दाबाने पाणी दिले जात नाही, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व सत्ताधारी राजकारण्याच्या राजकीय सुद्बुद्धीने घोटी व इतर गावांना पाणी दिले जात नाही, त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

निंभोरे गावामध्ये चारी नं 9 या चारीला 18 दिवस पाणी चालू असताना देखील या चारिवरील फूट तळे या उपचारीला जाणीवपूर्वक राजकीय द्वेषापोटी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाणी दिलेले नाही . पिकांना ,जनावरांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे, शेतातील कांदा ,ऊस व इतर पिके जळून चालली आहेत.

दहिगाव उपसा सिंचनाचे संबंधित अधिकारी श्री.औताडे यांनी 1 महिन्यापासून दर 2 व 4 दिवसात पाणी देण्याचे आश्वासन देऊन सर्व शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले आहे तरी त्यांच्यावरति योग्य ती कारवाई करण्यात यावी .

केवळ राजकीय सुबुद्धीने आम्हाला पाणी दिले जात नाही, कुणाचे नाव घेयचे म्हणले तर जास्तच राजकीय डुक धरून पाणी कधीच येऊ देयचे नाहीत म्हणून ही शेतकरी घाबरत आहेत.पण काही ही झाले तरी आम्हाला हक्काचे पाणी मिळाले पाहीजे.

सचिन राऊत, सरपंच, घोटी,ता.करमाळा,जि.सोलापूर

Web Title: Water Dahigaon Upsa Irrigation Scheme Crops Damaged

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top