Solapur: पाण्यावरून भावकीत हाणामारी, एक जखमी; महात्मा फुले झोपडपट्टीतील घटना; दोन्ही गटांच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा

नळावर आधी आम्ही पाणी भरतो, असे म्हणून दत्ता जाधव यांची सून लक्ष्मी, संजना यांनी सौदागर यांच्याशी वाद घातला. त्यामुळे ते घरी गेले. तेव्हा त्यांचा चुलता दत्ता याने आमच्याशी भांडण करायचे आहे का, अशी विचारणा करीत हाताने व लाकडाने त्यांच्या डोक्यावर मारले.
Crime News
Solapur Crime sakal
Updated on

सोलापूर : नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून भावकीतील दोन गटांत लाकडाने, पाईपने व विटांनी हाणामारी झाली. यात एकजण जखमी झाला. गुरुवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास मुरारजी पेठेतील महात्मा फुले झोपडपट्टीत ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन्ही गटांच्या एकूण दहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com