esakal | "भाजपचे नेते पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडताहेत !'
sakal

बोलून बातमी शोधा

jayant_patil

पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दत्तक घेतलेल्या गावात खासदार आले नसतील, तर त्याचं काय करायचं ते ठरवा. सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते, वेड्या माणसासारखे वागत आहेत. सत्तेसाठी सगळेच भाजपचे नेते पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडत आहेत, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. 

"भाजपचे नेते पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडताहेत !'

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दत्तक घेतलेल्या गावात खासदार आले नसतील, तर त्याचं काय करायचं ते ठरवा. सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते, वेड्या माणसासारखे वागत आहेत. सत्तेसाठी सगळेच भाजपचे नेते पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडत आहेत, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. 

सलगर बु (ता. मंगळवेढा) येथे भाषणा दरम्यान पाऊस आल्यामुळे जयंत पाटलांचे पावसातील भाषण विजयापर्यंत नेणार का, याची उत्सुकता लागली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये साताऱ्याच्या सभेत शरद पवार भिजले, ही सभा राष्ट्रवादीला विजयाबरोबर राज्यात नाट्यमय घडामोडी होऊन सत्तास्थापनेपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. त्याची चर्चा या सभेच्या निमित्ताने सुरू झाली. 

या वेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, मंगळवेढ्याला जास्तीत जास्त पाणी मिळावे यासाठी भारत भालके हे 2009 पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले तेव्हा मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या, अशी भूमिका भारत भालके यांनी घेतली होती. योगायोगाने मी जलसंपदा मंत्री झालो आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्‍याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दिवंगत आमदार भारत भालके यांनी यासाठी नेटाने प्रयत्न केले. 

सरकार बदलल्यानंतर या 24 गावांना दोन टीएमसी पाणी आणि गावे पूर्ववत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावला जाईल. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर - मंगळवेढा तालुक्‍यातील 24 गावांना सुजलाम - सुफलाम करण्याचा आमचा मानस आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. 

या वेळी आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे - पाटील, उमेदवार भगीरथ भालके, उमेश पाटील, राहुल शहा, अरुण किल्लेदार, आनंद शिंदे, बसवराज पाटील, पांडुरंग चौगुले, तानाजी काकडे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image