
Malshiras taluka reservoirs with low water storage amid failed desilting efforts.
esakal
माळशिरस: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत यावर्षी चार कामांना मंजुरी होती. संस्थांना कामे दिली होती; परंतु कामे न झाल्याने गाळ काढला गेला नाही. त्यामुळे पावसामुळे तलाव भरले असले तरी गाळामुळे तळ्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच, गाळ निर्मूलन योजना कागदावरच राहिल्याचे चित्र माळशिरस तालुक्यात दिसून आले.