
करमाळा : आम्ही आपल्याकडे काम केले आहे...आमचे प्रपंच अडचणीत आहेत...आमच्या कामाचे पैसे आम्ही मागतोय...आम्हाला आमचा पगार द्या, अशी मागणी करत श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी (ता. करमाळा) येथे कामगारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी कारखान्यासमोर आंदोलन केले. जोपर्यंत संपूर्ण पगार होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका यावेळी कामगारांनी घेतली.