धाराशिवच्या खासदाराने बार्शीसाठी काय केले? राणाजगजितसिंह पाटील

खासदाराचे काम काय असते तर लोकसभेत चर्चा घडवून केंद्राच्या योजनेअंतर्गत मोठा निधी मतदारसंघासाठी आणायचा असतो आणि प्रश्न मार्गी लावायचे असतात.
what did dharashiv minister for barshi development ranajagjitsinha patil politics
what did dharashiv minister for barshi development ranajagjitsinha patil politicsSakal

बार्शी : खासदाराचे काम काय असते तर लोकसभेत चर्चा घडवून केंद्राच्या योजनेअंतर्गत मोठा निधी मतदारसंघासाठी आणायचा असतो आणि प्रश्न मार्गी लावायचे असतात. आम्ही मराठवाड्यासाठीच्या हक्काच्या ३३ टीएमसी पाण्यासाठी ५० हजार कोटींची योजना आखली असून शेती, उद्योग, बेरोजगारांना काम मिळणार आहे.

तुमच्या बार्शीसाठी खासदाराने काय केले? बाळ किती गुणी आहे सांगायची गरज नाही? असा टोला खासदार ओमराजे निंबाळकरांना तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लगावला.

येथील स्टेशन रोडवर माऊली मंगल कार्यालयात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी (ता. १५) आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार पाटील बोलत होते. व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत, विक्रम काळे, माजी खासदार शिवाजी कांबळे, बाजार समिती चेअरमन रणवीर राऊत, विजय राऊत,

माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, संतोष निंबाळकर, निरंजन भूमकर, विक्रम सावळे, केशव घोगरे, रमेश पाटील, अरुण कापसे, अॅड. महेश जगताप, अॅड. अनिल पाटील, विलास रेणके, प्रशांत कथले उपस्थित होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले, राज्यात दोन वर्षांच्या काळात महायुतीने कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी खर्च केला आहे. विद्यमान खासदार नौटंकी करतात. आम्ही श्वाश्वत पाणी, उद्योग, १० हजार रोजगार, कौडगाव औद्योगिक वसाहत, बार्शीच्या बंद होऊ घातलेल्या मिलचा प्रश्न, पर्यावरणाचा कायापालट करणार आहोत.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, निसर्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण अनुदान शासनाकडे पाठपुरावा करून मिळवले. कांदा अनुदानासाठी प्रश्न मांडणार आहे. सोयाबीनसाठी ४ हजार कोटींची तरतूद झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक वाचविणारा एका बाजूला अन् बँक बुडविणारा एका बाजूला आहे. बाजार समितीत २ कोटी सेस होत. तो आता १३ कोटींपर्यंत आला आहे. ३ कोल्डस्टोरेज झालेत अजून १० होणार आहेत. त्यापैकी पाच वैरागमध्ये असतील. संतनाथ कारखाना सुरू करीत आहोत. बार्शी-सोलापूर रस्ता झाला तर तुळजापूर रस्ता मंजूर झाला आहे, असेही राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com