शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गंभीर तक्रारींबाबत काय म्हणाले गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई? ते वाचा 

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गंभीर तक्रारींबाबत काय म्हणाले गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई? ते वाचा 
Updated on

करमाळा(सोलापूर): करमाळ्यातील अधिकारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अडवणूक करत असल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे मंञी शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. 

करमाळा येथे आढावा बैठकी गृहराज्यमंत्री श्री. देसाई हे आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. 
जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मकाईचे दिग्विजय बागल, पंचायत समितीचे सभापती गहीनीनाथ ननवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत आवताडे, शहराध्यक्ष प्रविण कटारिया, महीला आघाडीच्या प्रियंका गायकवाड, देवानंद बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती शेखर गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख महेश चिवटे म्हणाले, तालुक्‍यातील अधिकारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकुन घेत नाहीत. एखादे काम सांगितले तर त्यांच्याविरोधी कारवाई केले जाते. अधिकारी निरपेक्ष न वागता राजकीय इशा-यावर कामे करतात. शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील 80 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या सत्ता ताब्यात आहेत असे असताना कोणत्याही विभागाचे अधिकारी शिवसैनिकांनी सांगितलेली कामे करत नाहीत .उलटपक्षी एखाद्या शिवसैनिक काम घेऊन गेला तर त्याला अधिकारी उलटसुलट बोलतात. 
यावेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी तालुक्‍यातील अधिकारी राजकीय हस्तक्षेपाने काम करत असल्याने शिवसेनेची सत्ता असताना नाहक ञास होत आहे. हे पक्ष वाढीसाठी अडचणीचे होत आहे. त्यामुळे तालुक्‍यात शिवसैनिकांची कामे होण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी गृहराज्यमंञी शंभुराजे देसाई यांच्याकडे या बैठकीत केली. 

अधिकाऱ्यांना सुचना दिल्या जातील 
करमाळ्यातील शिवसैनिकांनी अधिका-यांविषयी केलेल्या तक्रारीचा गांभीर्याने विचार केला जाईल. करमाळा तालुक्‍यात आतापर्यंत शिवसैनिकांची जी अडवणूक झाली ती यापुढे होणार नाही याची दक्षता घेण्यात आहे. याबाबत सर्व विभागाच्या अधिकाऱयांना तात्काळ सूचना देत आहे यापुढे शिवसैनिकांची कुठे अडवणूक झाल्यास थेट तक्रार करावी. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल . 
- शंभुराजे देसाई, गृहराज्यमंञी 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com