जोरदार पावसाने कुरनूर धरणात 100 दशलक्ष घनफुटापर्यत पोहोचला पाणीसाठा 

kurnur dharan.jpg
kurnur dharan.jpg

अक्कलकोट(सोलापूर): तालुकाभरात झालेल्या सर्वदुर पावसामुळे कुरुनूर धरणातील पाणीसाठा 111 दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला आहे. मुसळधार पावसाने ओढे भरून वाहत होते तर अनेक शेतात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. हत्ती तलाव देखील या पावसाने तुडुंब भरला आहे. 

अक्कलकोटला तालुक्‍यात ता.25 जुलै रोजीची नोंदलेली पावसाची आकडेवारी व कंसातील आजपर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडे पुढील प्रमाणे आहे. अक्कलकोट: 42 (157), चपळगाव 37 (171), वागदरी 39 (178), किणी 35 (171), मैंदर्गी 12 (149), दुधनी 40 (276), जेऊर 20 (119), करजगी 39 (124), तडवळ 42 (151) याप्रमाणे अक्कलकोट तालुक्‍यात ता.25 रोजी सरासरी पाऊस 34.00 मिमी झाला आहे. आतापर्यंत एकूण पाऊस हा 166.22 मिमी इतका झाला आहे. 
तालुक्‍यात झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढे भरून वाहत होते. ग्रामीण रस्त्यांवर पाणी साठल्याने काही वेळ वाहतूक देखील बंद झाली. 

कुरनूर धरणात पाणीसाठा 111 दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. एकूण टक्केवारी ही 13.6 टक्के एवढी झाली आहे. या पावसाने सलगर, करजगी तसेच त्यापुढे भीमा नदी काठापर्यंत अनेक शेतात पाणी शिरले होते. नागणसुर येथे काही वस्तीतील काही घरात पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली. बासलेगाव गावाजवळ ओढा भरून वाहत असताना जकापूर येथील प्रकाश हन्नूरे यांची गाडी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत होती. तेव्हा सागर पाटील, विश्वनाथ साखरे तसेच राम गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी मदत करत गाडी बाहेर काढली. 


पर्जन्यमापक यंत्रणा बदलण्याची गरज 
अक्कलकोट तालुक्‍यात सर्व गावासाठी अक्कलकोट, चपळगाव, किणी, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, करजगी व तडवळ ही नऊ मंडळे ठरविण्यात आले आहेत. त्या नऊ गावात ठरलेल्या ठिकाणीं ठेवलेल्या पर्जन्यमापकाच्या आधारे तालूक्‍याचा पावसाची आकडेवारी काढली जाते. पाऊस ठरविण्याची ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळे नेमकी तालुक्‍याची व अन्य गावातील पावसाची टक्केवारी कळण्यात आणि विविध योजना अंमलबजावणीत अडचण येऊ शकते. यासाठी तालुक्‍यातील पर्जन्यमापकाची नवीन पद्धत अंमलात आणण्याची मागणी होत आहे. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com