esakal | वाहतूक पोलिसाने पैसे मागितले म्हणून "त्याने' रस्त्यावरच काढले कपडे !
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Police

वाहतूक पोलिसाने पैसे मागितले म्हणून "त्याने' रस्त्यावरच काढले कपडे !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

येथील सात रस्ता परिसरातील मराठी पत्रकार भवनजवळून महावीर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अंगावरील कपडे काढून हंगामा केल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला.

सोलापूर : येथील सात रस्ता परिसरातील मराठी पत्रकार भवनजवळून महावीर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अंगावरील कपडे काढून हंगामा केल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला. वाहतूक पोलिस (Traffic police) कर्मचाऱ्याने पैसे मागितल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा होती. त्याअनुषंगाने त्या ठिकाणी ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे (Deputy Commissioner of Police Dr. Deepali Dhate-Ghadge) यांनी दिली. (When the traffic police demanded money, a person got into an argument and took off his clothes)

हेही वाचा: पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

शहरातील गॅस गोडावूनमधून एक दुचाकीस्वार घरगुती गॅस सिलिंडरची टाकी घेऊन जात होता. मराठी पत्रकार भवन परिसरातून महावीर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून तो निघाला. त्या वेळी चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने त्याला हटकत दुचाकी थांबवली व मास्क नसल्याचे कारण सांगून पैशांची मागणी केली. तेव्हा त्या दुचाकीस्वाराने "मास्क घालेन नाहीतर कपडे काढून फिरेन, तुम्हाला काय करायचे' असे उत्तर दिले. त्या वेळी "कपडे काढा नाहीतर काही करा, दंड भरा' अशी भूमिका तेथील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने घेतली. त्या वेळी त्या दुचाकीस्वाराने अंगावरील कपडे काढून हंगामा केला. त्या ठिकाणी उपस्थित एकाने व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. तो व्हिडिओ पोलिस उपायुक्‍त डॉ. धाटे यांच्यापर्यंत पोचला. त्याअनुंषगाने त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान, दुचाकीवरून गॅस सिलिंडर टाकी घेऊन जाताना त्या व्यक्‍तीने मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे त्याला वाहतूक पोलिसाने आवाज देत दंडाची मागणी केली. त्या वेळी दुचाकीस्वाराने दुचाकी थांबविली आणि उद्धट बोलू लागला. त्याला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने उलट उत्तर दिल्यानंतर त्या व्यक्‍तीने तसा गोंधळ घातला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत आली आहे. दरम्यान, तो दुचाकीस्वार मनोरुग्ण असल्याचेही पोलिसांना कोणीतरी सांगितल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी

दोषी असल्यास त्या कर्मचाऱ्याला थेट घरचा रस्ता

मराठी पत्रकार भवन परिसरातून महावीर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अंगावरील कपडे काढून सावर्जनिक रस्त्यावरच हंगामा केला. वाहतूक पोलिसाने पैसे मागितल्यानेच हा प्रकार घडल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. पोलिसांची बदनामी होऊ नये म्हणून त्या व्यक्‍तीचा शोध घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस अधिकारी करत आहेत. तर त्या ठिकाणी ड्यूटीवरील वाहतूक पोलिसाचीही चौकशी सुरू केली आहे. चौकशीत अवैधरीत्या पैसे मागितल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला थेट घरचा रस्ता दाखवला जाईल, असे पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी स्पष्ट केले.

loading image