esakal | 'त्या' दोघींनी कोरोना संकटात सलग शंभर दिवस जनमानसामध्ये केला आगळा प्रबोधनाचा जागर कुठे ? ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

jagar logo.jpg

कोरोना संकटाचा हा काळ आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक होता. त्याचप्रमाणे तो सर्व सामान्यांपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय पोहोचवण्यासाठी देखील तेवढाच महत्वाचा होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याबाबत अनेक प्रकारचे प्रबोधन केले. घराबाहेर पडून कोरोना संसर्ग असताना देखील योग्य काळजी घेतल लोकापर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचे काम केले. पंढरपूर शहरात देखील ऍड. वर्षा गायकवाड- यरनाळकर व लेखिका तथा कवियित्री लता भारत बहिरट यांनी याच पध्दतीने लोक प्रबोधनाची कामगिरी बजावली. स्वयंप्रेरणेने या दोघींनी परस्परांच्या मदतीने पंढरपुर परिसरात अनेक प्रकारे प्रबोधन केले.

'त्या' दोघींनी कोरोना संकटात सलग शंभर दिवस जनमानसामध्ये केला आगळा प्रबोधनाचा जागर कुठे ? ते वाचा 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर(सोलापूर)ः कोरोनाचे जागतिक महामारीचा संसर्ग वाढल्यापासून सोशल मीडियासह विविध माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्याचे काम येथील ऍड. वर्षा गायकवाड - यरनाळकर आणि लेखिका व कवियित्री लता भारत बहिरट या करत आहेत. या दोघींनी मिळून सलग शंभर दिवस सातत्य राखून आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाज प्रबोधनाचा पंढरपुर परिसरात वेगळा उपक्रम चालवला. 

हेही वाचाः इथे नांदतो जिव्हाळा अन माणुसकी...आजही येथील एकाच वाड्यात राहतात 16 कुटुंबे अन 80 लोक 

कोरोना संकटाचा हा काळ आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक होता. त्याचप्रमाणे तो सर्व सामान्यांपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय पोहोचवण्यासाठी देखील तेवढाच महत्वाचा होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याबाबत अनेक प्रकारचे प्रबोधन केले. घराबाहेर पडून कोरोना संसर्ग असताना देखील योग्य काळजी घेतल लोकापर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचे काम केले. पंढरपूर शहरात देखील ऍड. वर्षा गायकवाड- यरनाळकर व लेखिका तथा कवियित्री लता भारत बहिरट यांनी याच पध्दतीने लोक प्रबोधनाची कामगिरी बजावली. स्वयंप्रेरणेने या दोघींनी परस्परांच्या मदतीने पंढरपुर परिसरात अनेक प्रकारे प्रबोधन केले. कोरोना म्हणजे नेमके काय, कोरोना आजाराच्या संसर्गाची माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर असे अनेक मुद्दे लोकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 

हेही वाचाः अखेर... श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित 

ऍड. वर्षा गायकवाड- यरनाळकर यांनी प्रबोधनात्मक फलक लावणे, प्रबोधनात्मक घोषणा प्रसिद्ध करणे, जनजागृती बाबत रांगोळ्या काढणे, त्याचबरोबर रस्त्यावर प्रबोधनात्मक घोषवाक्‍य लिहिणे, लहान मुलांकडून घरबसल्या उपक्रम राबवणे तसेच दररोज आगळ्यावेगळ्या पद्धतीने व लोकांच्या मनाची पकड घेणारे लघु काव्य समाज माध्यमांवर व्हायरल करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या कामात सातत्य ठेवले. तब्बल तीन महिन्यापेक्षा अधिक काळ या महिलांनी त्यांचे प्रबोधन साहित्य व्हॉटसऍप व इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचवले. 
पंढरपूर येथील साहित्यिक लेखिका व कवियित्री लता भारत बहिरट यांनी या चळवळीत भाग घेऊन दररोज एक स्वरचित परिस्थितीनुरूप लघु काव्य रचले. या कविता ऍड. वर्षा गायकवाड यरनाळकर यांनी दृकश्राव्य अशा दोन्ही माध्यमातून सादरीकरण केले. या लघु काव्याची संहिता प्रसिद्ध करून दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली. या अनोख्या उपक्रमास सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी देखील या उपक्रमाचा गौरव केला. 
या आगळ्या वेगळ्या प्रबोधनाचा उपक्रम चालवत असताना त्याला सर्व सामान्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

loading image
go to top