esakal | शेती करावी की नको असं झालंय ! ढोबळी मिरचीने उत्पादकांच्या डोळ्यात आणले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

'शेती करावी की नको असं झालंय ! ढोबळी मिरचीने उत्पादकांच्या डोळ्यात आणले पाणी

'शेती करावी की नको असं झालंय ! ढोबळी मिरचीने उत्पादकांच्या डोळ्यात आणले पाणी

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे :

सांगोला (सोलापूर) : 'आता शेती करावी की नको असं झालयं, डाळिंबाची झाडं मर रोगान गेली, तर खर्च करुन ढोबळी, टोमॅटो (Tomato) फेकून देण्याची वेळ आली. उत्पादन खर्च मोठा झाला. परंतु हातात काहीच येत नाही. गड्यांचा पगार (salary) पण पदरचाच द्यावा लागतोय. काय करावे तेच समजत नाही'. मर रोगाने डाळिंबाची झाडे काढुन ढोबळी मिरची लागवड केलेला शेतकरी (Farmer) सध्याच्या दराने हावालदील होवुन बोलत होता. ऐंशी, नव्वद रुपये किलोने भाव खाणारी ढोबळी मिरची उत्पादकांंच्या सध्याच्या अवस्थेने उत्पादकांच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.

सांगोला तालुका म्हटले कि, 'डाळींबाचे आगार' अशी ओळख निर्माण झाली आहे. येथील मोठ्या प्रमाणावर डाळिंब उत्पादनामुळे माळरानावर डाळिंबाचे लाल सोनं पिकत होतं, परंतु डाळिंबीवर येणारे विविध रोग व विशेषतः मर रोगामुळे डाळिंबीची झाडे मोठ्याप्रमाणात जळून गेली. तालुक्यात डाळींबाचे 23 हजार पेक्षा जास्त हेक्‍टर क्षेत्र आहे. जळून गेलेल्या बागांमध्ये लगेच नवीन डाळिंब लागवड करता येत नसल्याने अनेक शेतकरी सध्या तरकारी म्हणजेच कारले, घेवडा, टोमॅटो, विशेषतः ढोबळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी ढोबळी मिरचीचे अंदाजे एक हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्यावर्षी ढोबळीचचे उत्पन्न बऱ्यापैकी झाल्यावर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढोबळी मिरचीची लागवड झाली. उत्पादनात मोठी वाढ झाल्याने जागेवर घेऊन जाणारे व्यापारी सुद्धा सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर येत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी एजंट करवी स्वतः किसान रेल्वेने बाजारपेठेत ढोबळी मिरची विक्रीसाठी पाठविली परंतु शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहिले नाही.

हेही वाचा: टोमॅटो उत्पादकांसाठी केंद्र सरकार 50% खर्च सोसायला तयार

चालू वर्षी ढोबळी मिरचीवर खर्च केलेला उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना निघाला नाही. शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या पदरमोड करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी खर्च करून हाती काही येत नसल्याने मिरची तोडून शेतात बांधावर किंवा खड्ड्यात फेकून देत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तर काही ठिकाणी पहावयास मिळत आहे तर काही शेतकरी सध्या तोटा होत असला तरी पुढच्या वेळेस दर वाढून हाती काही तरी आपल्याला शिल्लक राहिल आशेवर अजूनही खर्च करीत आहेत.

हेही वाचा: मुंबई: काशी मिरा येथे एक हजार किलो 'गोमांस' जप्त

पाच टन मिरची पाठवुन हाती एक रुपयाही नाही -

वाकी (शिवणे) येथील शेतकरी इंद्रजीत जाधव यांनी आपली 5 टन 850 किलो ढोबळी मिरची मुंबई मार्केटमध्ये पाठविली होती. परंतु वाहतुक, हमाली व इतर खर्च जाता त्यांना हातामध्ये एक रुपयाही शिल्लक राहिला नाही. उलट तोडणी व उत्पादन केलेला खर्च त्यांचा स्वतःचाच झाला आहे. पुढच्या तोडणी वेळेस तरी हाती काही शिल्लक राहिल आशेवर ते अजूनही खर्च करीत आहेत.

मिरचीवर फिरवणार रोटावेटर -

सध्याच्या परिस्थितीत ढोबळी मिरचीतुन काहीच शिल्लक राहत नाही. उलट पदरमोड करावी लागत असल्याने सव्वा एकर मिरचीवर ट्रॅक्टरच्या रोटावेटर फिरवुन मिरची काढून दुसरे काहीतरी पीक घेणार आहे असल्याचे संगेवाडी येथील शंकर खंडागळे या शेतकऱ्याने सांगितले.

loading image
go to top