esakal | गणपती विसर्जन करताना युवक वाहून गेला! अद्याप बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती विसर्जन करताना युवक वाहून गेला! अद्याप बेपत्ता

याबाबत अधिक तपास पोलीस करित आहेत.

गणपती विसर्जन करताना युवक वाहून गेला! अद्याप बेपत्ता

sakal_logo
By
चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर): मोहोळ रेल्वे स्टेशनजवळील स्लीफर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील 'श्री' गणेश मुर्तीचे आष्टे बंधाऱ्यावरील सिना नदीच्या पात्रामध्ये विसर्जन करण्यास गेलेला युवक वाहून गेल्याची घटना शनिवार (ता.11) रोजी दुपारी तीनच्या सुमारास  घडली.

हेही वाचा: मोहोळ कोरोनामुक्तीकडे! लसीकरणाचा ओलांडला पन्नास हजारांचा टप्पा

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ स्टेशनजवळ रेल्वे रूळाखालील सिमेंटचे स्लीफर तयार करणारा कारखाना आहे. या कारखान्यातील कामगार गेली अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करतात. या ठिकाणी ' श्री ' गणेशाच्या मूर्तीचे दीड दिवसात विसर्जन केले जाते. त्या अनुषंगाने शनिवार (ता.11) रोजी कंपनीचे  काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये 'श्री ' गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी मोहोळ शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या सिना नदीवरील आष्टे बंधाऱ्यावर गेले होते. त्या कामगारा पैकी सौरभ सुभाष बेंबलगे रा. लातूर ( वय वर्ष 20 ), हा पोहण्यास येत असलेला युवक मोठ्या उत्साहाने श्री मुर्ती घेऊन नदीच्या खोल पात्रात उतरला. अलिकडील काही दिवसामध्ये भोगावती सह सिनानदीला आलेल्या पुरामुळे पाण्याला वेग होता. परिणामी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबलगे हा युवक पाहता पाहता नदीच्या पात्रात गायब झाला. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी एका व्यक्तीने सांगितली.

हेही वाचा: सोलापूर-मोहोळ महामार्गावर पेटली कार! गाडीमधील तिघे सुरक्षित

यावेळी उपस्थित कंपनीचे कामगार मोठमोठ्याने ओरडण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत. सदर घटना पोलीस प्रशासनाला समजताच ग्रामरक्षक दलाचे  दत्तात्रय मोटे यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. बघ्यांची गर्दी हटविण्याबरोबरच स्थानिक कोळ्यांच्या मदतकार्यातही होमगार्ड दत्तात्रय मोटे सहकार्य करत असल्याचे दिसून आले. तसेच तहसिलदार राजशेखर लिंबाळे यांनी उशीरा घटनास्थळी भेट देऊन तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल यांना काही सूचना देत आदेश दिले. याबाबत स्लीपर कंपनीचे कार्यालयीन व्यवस्थापक प्रकाश पाटील यांना पोलीस स्टेशनच्या आवारात प्रत्यक्ष भेटून सदर दुर्घटनेबाबत खबर दाखल केली का ? असे विचारले असता त्यांनी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. याबाबत अधिक तपास पोलीस करित आहेत.

हेही वाचा: अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ!

दरम्यानच्या कालावधीमध्ये सिनानदीच्या पात्रामध्ये वाहून गेलेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी सिनानदीकाठालाच असलेल्या कोळेगांव येथील मच्छीमार बांधव अनुक्रमे ज्ञानेश्वर भुई, हरिचंद्र भुई, दत्ता भुई, लक्ष्मण भुई, सिंकदर पठाण, दिपक भुई व लक्ष्मण मल्लाव या सर्वांनीच त्यांच्याजवळच्या उपलब्ध साधनानिशी वेगाने वाहणाऱ्या सिना नदीच्या पात्रात बुडलेल्या युवकांचा शोध घेण्याचा सुमारे तीन ते चार तास प्रयत्न केला. पंरतु वाहत गेलेला युवक अदयाप सापडला नाही.

loading image
go to top