

Kumar Ashirvad IAS Journey from UPSC Rank 35 to Collector
Esakal
मराठवाड्यात गेल्या आठवड्याभरात पावसानं हाहाकार उडाला. यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. लातूर, धाराशिव, बीड, जालना यासह इतर जिल्ह्यांमध्ये सरकारकडून पूरबाधितांना मदत केली जातेय. दरम्यान, यातच शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या मदतीचे किट घेऊन सोलापूर जिल्ह्यातल्या पाकणी गावात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना अपुरी मदत मिळत असल्याचा दावा करत थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना सवाल विचारणाऱ्या ज्योती वाघमारे यांचीच फजिती झाली होती.