गट-तट आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अजिबात थारा नाही, असे कोण म्हणाले? ते वाचा 

गट-तट आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अजिबात थारा नाही, असे कोण म्हणाले? ते वाचा 
Updated on

सांगोला(सोलापूर): गट-तट आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अजिबात थारा देणार नाही. पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांना सोबत घेऊन पक्षाचा अजेंडा व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी स्पष्ट केले. 


भाजपचे जिल्हाध्यक्ष निवडीनंतर श्री. देशमुख यांनी विविध ठिकाणी त्यांची भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी काम करण्याची संधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. त्यांनी ज्या अपेक्षेने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. गट-तट आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अजिबात थारा देणार नाही. पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांना सोबत घेऊन पक्षाचा अजेंडा व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. 

जिल्ह्यात ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, व लोकसभा मतदारसंघावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. येणाऱ्या काळात पक्षाने हाती घेतलेल्या "शत-प्रतिशत भाजपा" हाच विचार डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण जिल्हा भाजपामय करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याकामी पक्षातील निष्ठावंत, ज्येष्ठ नेते, वरिष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन जिल्हाभर विस्तारलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार. विवीध सामाजीक उपक्रम राबवले जातील. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानूनच लोकहिताचे काम करण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur
MLA Devendra Kothe  
Solapur city police
Bike Car Accident
Marathi News Esakal
www.esakal.com