esakal | बायकोला पाजले विष;मिळाली दहा वर्षांची सक्तमजुरी 
sakal

बोलून बातमी शोधा

court logo

असा केला युक्तिवाद 
आरोपीला दया दाखवू नये, त्याने त्याच्या पत्नीसोबत यापूर्वीही असे प्रसंग केले आहेत. आरोपीने यापूर्वीही फिर्यादीच्या अंगावर रॉकेल ओतले होते म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आली. त्यांचा हा युक्तिवाद न्यायाधीशांनी ग्राह्य धरला. 

बायकोला पाजले विष;मिळाली दहा वर्षांची सक्तमजुरी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शिवीगाळ करून विष पाजल्याप्रकरणी मोहोळ तालुक्‍यातील वाघोली येथील नामदेव रामचंद्र चोरमुले याला सोलापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. जी. मोहिते यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षाच्या सक्तमजुरीचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच भादवि कलम 504 अन्वये दोन वर्ष साध्या कैदेचीही शिक्षा सुनावली आहे. 
हेही वाचा - सोलापुरातील महिलांची सुरक्षा रामभरोसे 
2015 मध्ये आरोपी नामदेव चोरमुले रात्री घरी आल्यानंतर दारूच्या नशेत त्याने पत्नीला जोरजोरात शिवीगाळ केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करू लागला. शेळ्यांवरील गोचीड मारण्याचे औषध त्याने त्याच्या पत्नीला पाजले. त्यानंतर त्याची पत्नी बेशुद्ध झाली. नातेवाइकांनी तिला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पत्नी शुद्धीवर आल्यानंतर तिने पतीच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी आरोपीला अटक करून या खटल्याचा तपास पूर्ण केला. 
हेही वाचा - सोलापूर भाजप खासदारांवर 420 चा गुन्हा दाखल 
या खटल्याची सुनावणी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहिते यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष व वैद्यकीय पुरावा या खटल्यात महत्त्वाचा ठरला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड. अहमद काझी यांनी तर आरोपीतर्फे ऍड. एस. आर. शेटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल धर्मे यांनी काम पाहिले.

loading image
go to top