

Political Buzz: Bhagirath Bhalke Discusses Shiv Sena Entry with Supporters
sakal
पंढरपूर : शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतःसाठी कोणतेही पद मागितले नाही. विधानसभेच्या सभागृहात जाईन तर समोरासमोर लढूनच जाईन. मागच्या दारातून कधीही जाणार नाही, असे खुले आव्हान भगीरथ भालके यांनी आज विरोधकांना दिले.