
Solapur Crime
sakal
सोलापूर : अक्कलकोट रोडवरील गांधी नगरातील स्नेहारिका अपार्टमेंटमधील ओळखीच्याच महिलेने देवकी आनंद चिट्याल व मंजुळा श्रीनिवास फुलपाटी या दोघींच्या घरातील साडेसात लाखांचे दागिने लंपास केले. देवकी चिट्याल यांच्या फिर्यादीवरून संशयित महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने चोरीची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.