esakal | होम आयसोलेशनमधील महिलेचा रुग्णालयात मृत्यू ! होम आयसोलेशनला परवानगी दिली कोणी?
sakal

बोलून बातमी शोधा

होम कॉरंटाईन

होम आयसोलेशनमधील रुग्ण नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नाहीत, त्यामुळे हा प्रकार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र, शहरात अजूनही तसा निर्णय झालेला नाही.

होम आयसोलेशनमधील 32 वर्षीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : होम आयसोलेशनमधील (home isolation) रुग्ण नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नाहीत, त्यांच्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याने हा प्रकार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र, शहरात अजूनही तसा निर्णय झालेला नाही. दरम्यान, सैफुल परिसरातील 32 वर्षीय महिलेला संबंधित नागरी आरोग्य केंद्राकडून होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली. मात्र, 24 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) उपचार घेताना त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Woman dies at hospital due to corona in home isolation in Solapur)

हेही वाचा: परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी

शहरातील ओम गर्जना चौक, सैफुल परिसरातील 32 वर्षीय महिलेला कोरोनाची (Covid-19) बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्या महिलेला संबंधित नागरी आरोग्य केंद्राकडून होम आयसोलेशनसाठी परवानगी देण्यात आली. 11 मे ते 22 मे पर्यंत त्या महिलेने घरात राहूनच उपचार घेतले. मात्र, 22 मे रोजी त्या महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने सुरवातीला मोणार्क हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नातेवाइकांनी आणले. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्या महिलेस 24 मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याच दिवशी उपचारादरम्यान त्या महिलेचा कोरोनाने बळी घेतला. ही बाब मंगळवारी समोर आली असून त्या महिलेला होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली कोणी, त्या महिलेची दररोज विचारपूस करण्यात आली नाही का, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. याबाबत महापालिका आयुक्त, उपायुक्त, आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा: जिल्ह्यातील रुग्णांची दीड लाखाकडे वाटचाल ! नव्याने वाढले 965 रुग्ण

हलगर्जीपणामुळेच वाढले मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आतापर्यंत एक हजार 353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी, को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी जाणार नाहीत, याची खबरदारी घेत शिक्षकांच्या माध्यमातून चारवेळा घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. तरीही, को-मॉर्बिड रुग्णांचे मृत्यू कमी झालेले नाहीत. सर्व्हेबाबत शंका उपस्थित होत असतानाच आता होम आयसोलेशनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. होम आयसोलेशन करण्यापूर्वी फॅमिली डॉक्‍टर, घरातील काळजी घेणाऱ्या व्यक्‍तीच्या परवानगीने त्या रुग्णाला परवानगी दिली जाते. रुग्ण बरा होईपर्यंत संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर वॉच ठेवला जातो. तरीही, ती महिला 11 ते 22 मेपर्यंत क्रिटिकल होईपर्यंत का समजले नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता त्या महिलेच्या मृत्यूची कारणे शोधली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.