International Women's Day: कुटुंबाच्या पाठबळावर वकिली क्षेत्राकडे महिलांचा कल

समुपदेशक, न्यायाधीश होण्याची संधी; आव्हानांवर मात करून नावलौकिकास वाव
women in law field counselor judge education
women in law field counselor judge educationSakal

Solapur News : कुटुंबाच्या पाठबळावर चार-पाच वर्षांत वकिली क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढत असल्याने समुपदेशक म्हणून काम करण्याची संधी महिलांना वकिलीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

धर्मादाय आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात देखील वकिली क्षेत्रातील महिला समुपदेशक आहेत, विधी सल्लागार म्हणून विविध शासकीय- खासगी कार्यालयांमध्येही त्यांना संधी आहे. महिला न्यायाधीशांचा टक्का वाढत असल्याने या क्षेत्राकडे तरुणींचा कल वाढल्याची स्थिती आहे.

शहर व ग्रामीण पोलिसांकडे दरमहा सरासरी दोनशे विवाहिता कौटुंबिक वादाचे गाऱ्हाणे घेऊन येतात. किरकोळ कारणातून सुखाचा संसार तुटणार नाही, याची दक्षता पोलिसांबरोबरच महिला वकिलांकडून घेतली जाते.

कौटुंबिक न्यायालय असो की पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी फिर्यादी महिला शक्यतो महिला वकिलांचीच मदत घेतात. सोलापूर शहर- जिल्ह्यात सध्या वकिली क्षेत्रात पदार्पण केलेल्या महिलांची संख्या साधारणतः आठशेपर्यंत आहे.

पण, अजूनही बरेच पालक आपल्या मुलींनी या क्षेत्रात करिअर करावे, अशा मानसिकतेत नाहीत. या क्षेत्रात कमी कालवधीत नावलौकिक मिळविण्याचा व न्यायाधीश होऊन न्यायदान करण्याची संधी मिळते. त्यामुळे दरवर्षी ‘लॉ’साठी प्रवेश हाऊसफुल्ल होतात. पण, पालकांनी त्यांची मानसिकता सोडून मुलींना तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी द्यावी, अशी तरुणींची अपेक्षा आहे.

महिला वकिलांसमोरील आव्हाने

  • कायद्याविषयी अद्ययावत माहिती, अभ्यास कमी असल्याने अडचणी

  • कुटुंबाची साथ नसल्याने किंवा विवाहानंतर मधूनच सोडावे लागते वकिली क्षेत्र

  • नव्याने या क्षेत्रात आलेल्या महिला वकिलांना ज्युनिअर, सिनिअर या भेदभावाचा करावा लागतो सामना

आव्हानांवर हे उपाय ठरतील रामबाण

  • वेगवेगळ्या केससंदर्भातील आदेश, कायद्यातील बदलासंदर्भात नेहमीच अद्ययावत असावे

  • महिला वकिलांना नावलौकिक मिळविण्यासाठी कुटुंबाची हवी ‘ती’ला साथ

  • ज्युनिअर व सिनिअर वकिलांचा भेद कायद्याच्या सखोल अभ्यासातूनच होईल दूर

महिलांचा शिक्षणातील टक्का वाढला असून त्यांच्यात कायद्याबद्दल जागृती दिसून येते. अनेक मुली, नवविवाहिता स्वत:ची केस लढून स्वत:च वकील झाल्याचीही उदाहरणे आहेत. आपल्याला कायद्याचा अभ्यास असला की न्याय मिळतोच, असा आत्मविश्वास महिलांना वाटतोय म्हणून या क्षेत्रात महिलांची संख्या वाढत आहे. पण, तिला कुटुंबाची खंबीर साथ जरुरी आहे.

- ॲड. रेखा गोटीपामूल, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com