
सोलापूर : महापालिका रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची आर्थिक लूट करणे, सुविधा असताना सिव्हिल व खासगी रुग्णालयाकडे पाठवल्याच्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या संदर्भात कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.