esakal | कसली "कोरोना'ची दहशत; ही तर जगण्यासाठी लढाई 
sakal

बोलून बातमी शोधा

Work of farmers start in Solapur district

"कोरोना'ने सध्या जगभर हाहाकार माजवला आहे. राज्यात त्याची लागण झाल्याचे रुग्ण रोज वाढत आहेत. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी आदेश जारी केला. याबरोबर रेल्वे, एसटी व खासगी वाहतूकही बंद केली आहे. अपवाद वगळता अनेक कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसादही दिला जात आहे.

कसली "कोरोना'ची दहशत; ही तर जगण्यासाठी लढाई 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लॉकडाउन झाला आहे. शहरातली अनेक कार्यालये, बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण ग्रामीण भागात जात आहेत. मात्र, अशा स्थितीतही शेतातली कामे जोरात सुरू आहेत. सध्या सुगीचे दिवस सुरू असून "कोरोना'च्या चर्चेतच शेतातली कामे सुरू आहेत. आता "कोरोना'च्या भीतीने घरात बसलं तर वर्षभर काय खायचं, असा प्रश्‍न शेतकरी करत आहेत. 
"कोरोना'ने सध्या जगभर हाहाकार माजवला आहे. राज्यात त्याची लागण झाल्याचे रुग्ण रोज वाढत आहेत. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी आदेश जारी केला. याबरोबर रेल्वे, एसटी व खासगी वाहतूकही बंद केली आहे. अपवाद वगळता अनेक कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसादही दिला जात आहे. याशिवाय विनाकारण नागरिकांनी न फिरता घरीच बसावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे पुणे व मुंबईतील अनेकजण सध्या गावाकडे जात आहेत. त्यामुळे शहरी भाग बंद पडत आहे. अशा स्थितीत सुद्धा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शेतीवर अद्याप परिणाम झालेला नाही. नागरिकांत भीतीचे वातावरण असले तरी, आमचं पोटच त्याच्यावर असल्याचे सांगत आता काम नाही करायचे तर वर्षभर काय खायचं असं म्हणून जोमाने शेतातली कामे करत आहोत. 
मंगळवेढा तालुक्‍यातील सुनंदा कोळी यांना "कोरोना'बाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ""कोरोना'चा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवीच. पण सुगीच्या दिवसात शेतातली कामे नाही केली तर वर्षभर काय खायचे. सध्या शेतातला हारभरा काढण्याचे काम सुरू आहे. उन्हामुळे हरभरा लगेच वाळत आहे. बाजार बंद असल्यामुळे तो विकता येईल की, नाही माहीत नाही. पण शेतात ठेवून त्याचे नुकसान होणार आहे. त्यापेक्षा तो काढून ठेवलेला बरा.'' 

बकऱ्यांना काय घालणार खायला 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र जमावबंदी केली आहे. शहरातले अनेकजण ग्रामीण भागात येत आहेत. त्याची धास्ती घेऊन गावातल्या रंगणाऱ्या गप्पांचे स्वरूपही बदलले आहे. त्याच्या भातीने आपल्याला घरात बसून कसे चालेल असा प्रश्‍न ग्रामीण केला जात आहे. माडग्याळ येथील मेंढापाळ केरप्पा वगरे म्हणाले, "कोरोना'च्या भीतीने घरात बसलो तर बकऱ्यांना काय खायला घालायचे. त्यांना तर फिरवावे लागतच आहे. अन्‌ येथे कोठे आहे सॅनिटायझर आणि मास्क. आमचा लढा जगण्याशी आहे. कोरोनाशी नाही.

loading image