रेंगाळणा-या प्रवासातून सोलापूरकरांची होणार सुटका; हडपसर टर्मिनलचे काम सुरु

The work of Hadapsar terminal in Pune section of Central Railway has started
The work of Hadapsar terminal in Pune section of Central Railway has started
Updated on

सोलापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील हडपसर टर्मिनलचे काम सुरु झाले आहे. हडपसर येथील फलाट दोन आणि तीनचे विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणा-या फलाट मिळविण्यासाठी आउटरवर थांबावे लागत होते. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास रेंगाळत होता. पुणे रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या फलाटांची उणीव आहे. मात्र हडपसर येथील टर्मिनलचे काम सुरु झाल्याने सोलापूरकरांची आउटरवर रेंगाळणा-या प्रवासातून लवकरच सुटका होणार आहे. 

सोलापूर रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाची फलाटांची संख्या अपुरी पडत असल्याने पुणे रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनस येथे फलाटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. हडपसर याठिकाणी तीन फलाट आहेत. सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना आऊटरवर थांबावे लागत होते. त्यामुळे हडपसर ते पुणे हे तीन किमीचे अंतर कापण्यासाठी 15 ते 20 मिनिटे गाड्यांना आऊटरवरच थांबावे लागते.

पुणे रेल्वे स्थानकांवर गाड्यांना फलाट मिळत नसल्याने आऊटरवर 15 ते 20 मिनिटे रेंगाळत थांबावे लागते. हडपसर टर्मिनल येथे दोन स्टेबलिंग लाईनला देखील मंजूरी मिळाली आहे. हडपसर येथील टर्मिनलमुळे पुणे रेल्वे स्थानकांवरील गाड्‌याचा ताण कमी होणार आहे. भविष्यात रेल्वेगाड्‌यांची संख्या वाढणार आहे. 

ठळक बाबी 

आउटरवर थांबावे लागणार नाही. 
हुतात्मा, इंद्रायणी या गाड्‌यांची होणार सुटका
भविष्यात नवीन रेल्वे गाड्‌या सुरू होण्याची शक्यता
सोलापूरकरांचा प्रवास होणार जलद
लुज मार्जिन कमी होईल

पुणे रेल्वे स्थानकावर फलाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे हडपसर येथे टर्मिनस करण्याचे काम सुरू आहे. प्रवास जलद होण्यास मदत होईल नवीन गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com