
सोलापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला होता. यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा मोठा सहभाग होता. चळवळीने झपाटलेल्या अण्णाभाऊंनी लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून सोलापुरात पोवाड्यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राबरोबरच कामगार चळवळीचे स्फुल्लिंग चेतविले. याशिवाय त्यांनी बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर या ठिकाणीही लोकांचे प्रबोधन करून चळवळ मजबूत करण्याचे कार्य केले, अशा आठवणी अण्णाभाऊंच्या साहित्य अभ्यासकांनी जागवल्या.