how plastic waste affects agriculture productivity
esakal
सोलापूर : कृषी क्षेत्रात वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या मायक्रोप्लास्टिकमुळे जमिनीचे आरोग्य, पिकांची उत्पादकता आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत (Microplastic Pollution) असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी (एनएएएस) च्या ताज्या अहवालानुसार, देशात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम शेतीप्रधान जिल्ह्यांवर, विशेषतः सोलापूरसारख्या भागांवर होण्याची शक्यता आहे.