जागतिक कुष्ठरोग दिन : नियोजन कागदाबाहेर येईना

World Leprosy Day Planning Does Not Come Out
World Leprosy Day Planning Does Not Come Out
Updated on

सोलापूर : राज्यातील कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आरोग्य विभागाने "स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी, कुष्ठरोग निर्मूलन अभियानाअंतर्गत मागील आठ-दहा वर्षांत सुमारे दहा हजार कोटींपर्यंत खर्च करुनही राज्यातील कुष्ठरुग्णांची संख्या कमी झालेली नाही. चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, अमरावती, पालघरसह अन्य 27 जिल्ह्यांमध्ये तब्बल 12 हजार 116 कुष्ठरुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत 'कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द' या घोषवाक्‍यानुसार राज्यभर कुष्ठरोग निर्मूलनाची विशेष मोहीम राबविली जात आहे. महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारीला सर्व ग्रामपंचायतींमध्ये कुष्ठरोग निमूर्लनाबाबत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांमध्येही विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. 
- डॉ. पद्मजा जोगेवार, 
संचालक, कुष्ठरोग निर्मूलन 


कुष्ठरोग निमूर्लनासाठी जनजागृती 
आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जातो. वर्षातून एकदा अशी मोहीम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते. कुष्ठरोग निमूर्लनासाठी ग्रामसभा, शाळांमधून जनजागृती, प्राथमिक आरोग्य केंद्रांबाहेर आजाराची लक्षणे, उपायांचे फलक लावणे, बचत गट, महिला मंडळांमार्फत विविध कार्यक्रम असे कागदोपत्री ठोस नियोजन दरवर्षी केले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यानुसार अंमलबजावणी झाली नाही. 

476 प्राथमिक आरोग्य केंद्रे कुलूपबंद 
कर्मचाऱ्यांअभावी राज्यातील सुमारे 476 प्राथमिक आरोग्य केंद्रे कुलूपबंद असून ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये 40 टक्‍क्‍यांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचेही चित्र पहायला मिळते. आता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत सुमारे तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित असून मोहिमेचे कागदोपत्री केलेले नियोजन प्रत्यक्षात कितपत उतरणार, याकडे लक्ष लागले आहे. 

ठळक बाबी... 

  •  'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम 
  •  26 जानेवारीला कुष्ठरोगाबाबत आवाहनाचे वाचन करण्याचे निर्देश : बहूतांश कार्यालयांची त्याला बगल 
  •  राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत 12 हजार 116 कुष्ठरुग्ण : मोहिमेंअतर्गत तीनशे कोटींचा खर्च 
  •  'एमडीटी' या प्रभावशाली औषधाचा सर्व सरकारी दवाखाने व आरोग्य केंद्रांना पुरवठा 
  •  राज्यातील 476 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कुलूप : सरकारी रुग्णालयांत 40 टक्‍क्‍यांहून अधिक पदे रिक्‍तच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com