म्हणून वाचला विहिरीत पडलेला विक्रेता

Barshi
Barshi
Updated on

बार्शी (सोलापूर) : शहरातील जगदाळेमामा हॉस्पिटल आवारामध्ये असलेल्या विहिरीच्या कट्ट्यावर बसलेला कुल्फी विक्रेता अचानक विहिरीत पडला. त्यानंतर गोंधळ सुरू झाला. एक तास अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या दोन जवानांना त्यास बाहेर काढण्यात यश आले. त्याचा जीव वाचला. या दोन तरुणांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. छगन रामलिंग शेंद्रे (वय 60, रा. उपळाई रोड) असे विहिरीत पडलेल्याचे नाव आहे.

सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास जगदाळेमामा हॉस्पिटल आवारातील विहिरीच्या कट्ट्यावर कुल्फी विक्रेता बसलेला असताना अचानक कोसळला. यावेळी त्यास विहिरीत पडताना अनेकांनी पाहिले. विहिरीला एकही पायरी नाही. त्याला बाहेर कसे काढायचे, असा प्रश्‍न निर्माण होऊन बघ्यांची मोठी गर्दी विहिरीच्याकडेने जमा झाली अन्‌ शूटिंग सुरू झाले. 

हेही वाचा- राईनपाडा प्रकाणात चार जणांची साक्ष तपासली
यांनी केली मदत

विहिरीत पडलेल्या शेंद्रे यांनी कडेला धरून आश्रय घेतला. अग्निशमन दल येईपर्यंत नागरिकांनी विहिरीत साडी सोडून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याचवेळी बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून मदत मागण्यात आली. अग्निशमन दलाचे वैभव बोकेफोडे, रोहित लोंढे, प्रकाश जाधव या तीन जवानांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत खाली उतरून शेंद्रे यांना वर काढून जगदाळेमामा रुग्णालयात दाखल केले. बघ्यांनी मात्र दोरी धरण्यासाठी मदत केली नाही, असे जवानांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. या तिघांना दलातील आकाश ढवळे, महेश माळी, राजेंद्र बकशेट्टी, जयपाल अलाट, भारत गुंड, विष्णू घाटगे यांनी मदत केली. 

विहिरीला जाळी बसवा' 
जगदाळेमामा रुग्णालय आवारात अनेक रुग्णांचे नातेवाईक या विहिरीच्या आवारात असणाऱ्याऱ्या झाडाखाली बसून जेवण करीत असतात. अनेक सोबत आलेली लहान मुले खेळत असतात. या विहिरीला प्रशासनाने संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी यावेळी अनेकांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A Legacy of Four Decades: Wrestling Tradition Alive in Mangalwedha
Wari Festival Update: Authorities Propose Exemption to Continue Ashadhi Wari Arrangements Smoothly
Action under MPDA
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com