World Photography Day : वडिलांचा विरोध पत्करून सुरु केली फोटोग्राफी ; आज आहे यशस्वी फोटोग्राफर !

एक कॅमेरा घेवून फोटोग्राफी सुरु केली.
sharad sakhre
sharad sakhre sakal

Success Story : केवळ छंद म्हणून ग्रामीण भागात फोटोग्राफी व्यवसाय सुरू करून त्यामध्ये अर्जट फोटो देण्यासाठी आणखीन एक पाऊल टाकत स्वतःची फोटो प्रिंटिंग मशीन खरेदी करून डिजिटल जमान्यातही फोटोग्राफी व्यवसायात स्थिरवण्याचा प्रयत्न मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील शरद साखरे या उत्साही तरुणांनी केला.

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी सारख्या ग्रामीण आणि रोजगारासाठी स्थलांतर करणाय्रा गावात शिक्षक वडीलाने मुलांनी शिकून नोकरी करावी अशी इच्छा होती.

ग्रामीण भागातच माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यावर मंगळवेढयाच्या दामाजी महाविदयालयात महाविदयालीयन शिक्षण घेतले. त्याचवेळी फोटोग्राफी इच्छा मनाला भावली. बारावी संपताच गावात जनरल स्टोअर्स व्यवसाय सुरु केले. यातून पुढे किराणा दुकान सुरु केले.

sharad sakhre
Mumbai Police: ...अन् तो पोलीस स्वतःच झाला रुग्णवाहिका, सतर्कतेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक

ग्रामीण व्यवसायाबरोबर मंगळवेढयाच्या श्रध्दा सबुरी पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम केले. याचवेळी मनात फोटोग्राफी छंद मात्र जागा सोडायला तयार नव्हता. एक कॅमेरा घेवून फोटोग्राफी सुरु केली. (Latest Marathi News)

ग्राहक अर्जट मागत असल्यामुळे यातील रोल खराब होत असे. पण ते काढलेले फोटो धुण्यासाठी पंढरपूरला जावे लागत होते. अशातच फोटोचा स्टुडीओ घरात सुरु केला. पण या व्यवसायातील भविष्य लक्षात घेवून हा व्यवसाय मंगळवेढयात सुरु करण्याचा संकल्प केला.

बसस्थानकाशेजारील कृषी उदयोग संघाच्या व्यापारी गाळयात मित्र मंडळी व अक्षर वर्ल्ड परिवाराच्या माध्यमातून छोटयाशाच्या जागेत फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला.

यातून मंगळवेढयातील फोटोग्राफरचा पंढरपूर जाण्यासाठी होणारा खर्च आणि वेळ वाचावा म्हणून अदययावत फोटो देण्याची मशिन आणून लॅब सुरु केली.

नऊ वर्षात या व्यवसायात वेगवेगळे बदल स्विकारून चांगला जम बसला. यासाठी पत्नी अनिता व मुलाचे सहकार्य लाभले. एक रुपयाच्या प्रिटींग पासून ते एक हजारा रुपयाचे प्रिटींग काढल्यामुळे आय.एस.ओ प्राप्त केलेली पाहिली लॅब ठरली.

sharad sakhre
Kolhapur Crime : कडबाकुट्टी यंत्रानं घेतला सासू-सुनेचा बळी; विजेच्या धक्क्यानं दोघींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा

घरातील सुस्कृंत वातावरण मुलानेही शिक्षित होवून नोकरी करावी अशी इच्छा वडीलाची असताना वडीलाच्या इच्छेविरुध्द जावून केवळ छंदापाई फोटोग्राफी व्यवसाय सुरु केला आणि याच व्यवसायात दोन पाऊल पुढे टाकत मंगळवेढ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी नागेश फोटो या नावाने व्यावसायात स्थिरावलो.

शरद साखरे, नागेश फोटोवाला,मंगळवेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com