Solapur Crime : घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवल्याने दोन चोरट्यांनी साडे पाच लाख रूपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला

ही घटना टेंभुर्णीतील झिरपे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
worth rs 5 lakh house robbery in solapur police
worth rs 5 lakh house robbery in solapur policeSakal

टेंभुर्णी : उन्हाळ्यामुळे घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवल्याने दोन चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन घरातील अंदाजे साडेदहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अडीचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख एक लाख दहा हजार रूपये असा एकूण पाच लाख पंचेचाळीस हजार रूपयांच्या ऐवज लंपास केला.

ही घटना टेंभुर्णीतील झिरपे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानासाहेब बबन देशमुख(वय 46 रा.झिरपेवस्ती, टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नानासाहेब देशमुख हे पत्नी विद्या,भाऊ लालासाहेब,भावजय चैत्राली,वडील बबन,आई कालिंदा असे मुलांसह एकत्र कुटुंबात राहतात. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण करून नानासाहेब देशमुख त्यांची पत्नी विद्या व वडील बबन हे घराच्या समोरील अंगणात घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन झोपले होते.

घरातील हाॅलमध्ये आई कालिंदा वबेडरूममध्ये मुलगा अभय व मुलगी अबोली झोपले होते. भाऊ लालासाहेब व भावजय चैत्राली त्याच्या बेडरूममध्ये झोपले होते.घराचा मुख्य दरवाजा हा उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरम होत असल्याने हवा यावी म्हणून अर्धवट उघडा ठेवला होता.

रात्री दिड वाजण्याच्या सुमारास लालासाहेब,त्याची पत्नी चैत्राली यांचा घातून चोर चोर ओरडण्याचा आवाज ऐकल्याने नानासाहेब देशमुख यांनी उठून पाहिले तेव्हा दोन अनोळखी इसम हे घराच्या पूर्व दिशेकडील दरवाजातून पळून बाहेरजाताना दिसले.

शत्याच्या पाठीमागे फिर्यादीचा भाऊ लालासाहेब व मुलगा अभय हे चोर चोर म्हणून पळू लागले. त्यामुळे नानासाहेब हे देखील चोरांच्या पाठीमागे पळू लागले.परंतू दोन्ही चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

यानंतर सर्वजण घरी आले तेव्हा भावजय चैत्राली हिने तिच्या बेडरूम मध्ये रात्री एक वाजून मिनिटे वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यामध्ये एक मध्यम जाडीचा सावळा रंगाचा अंगात लाल बनियन घातलेला होता तर दुसरा मध्यम जाडीचा अंगात काळ्या रंगाचा बनियन घातलेला होता.

घरातील कपाटातून चोरी करीत असताना तिला जाग आल्याने दोन चोर तेथून पळून गेल्याचे तिने सांगितले. घरातील सोन्याचे व चांदीचे दागिन्यांची पाहणी केली असता चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने,रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

या चोरट्यांनी 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लाॅकेट व बदाम,5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,5 ग्रॅम वजनाची महिलांची दोन अंगठी, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व पॅन्डल,10 ग्रॅमवजनाची सोन्याची वेडणी,चोकर,5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेडणी,5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, 8 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार अंगठ्या,

250 ग्रॅम वजनाची चांदीचे पैंजण, बिचव्या, जोडवी व 1 लाख 10 हजार रूपये रोख असा एकूण 5 लाख 45 हजाररूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com