यावर्षी सोलापूर बाजारातील उडीद पहिल्यांदाच जाणार राजस्थानला 

udid packing.jpg
udid packing.jpg
Updated on

सोलापूरः येथील मार्केट यार्डात मुग व उडदाची आवक मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली असून पावसाने दिलेल्या उघाडीने विक्रीचा हंगाम जोरात सुरू आहे. यावर्षी दक्षिणेकडील राज्याच्या सोबत पहिल्यांदाचा उडिद राजस्थानला पाठवला जात आहे. 

या वर्षी वेळेवर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना साथ दिली. मुग व उडिदाचे पीक मागील वर्षीच्या तुलनेत डबल उतारा देणारे ठरले आहे. नंतरच्या पावसाने मुगाला थोडा फटका बसला. त्यामूळे सत्तर ते एैंशी टक्के माल डागाळला आहे. नंतर पावसाने उघाड दिल्याने उडीद व मुगाची काढणी झपाट्याने पुर्ण झाली. 

दरवर्षी उडीदाला तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशा दक्षिणेतील राज्यातून मोठी मागणी असते. त्या राज्यात दैनंदिन आहारात उडीदाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यावर्षी मात्र अचानक राजस्थानातून उडीदाला मागणी आली आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच उडीद राजस्थानला पाठवला जात आहे. सध्या दररोज पाच हजार पोत्यांची आवक सुरू आहे. उत्पादन चांगले असून मालाचा दर्जा देखील चांगला आहे. 
मुगाचे उत्पादन पावसाच्या माराने थोडे फार डागाळले असले तरी भाव मात्र चांगले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भाव अधिकच आहेत. साधारण डागाळलेल्या मालाचे प्रमाण खुप अधिक आहे. स्थानिक दालमिल व बाजारपेठामधून मुगाला मागणी अधिक आहे. मुगाला परराज्यात फारशी मागणी नसते व मालाची आवक स्थानिक गरजा भागवण्यापुरती होते. दररोज एक हजार पोते मुगाची आवक सध्या सूरू आहे. मुग व उडीदाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांना एका दिवसाआड एक वेळ अशी लिलावात सहभागी होण्याची सोय केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची गर्दी न होता लिलाव देखील कमी वेळेत होऊ लागले आहेत. 

मागील वर्षीच्या तुलनेत भाव चांगले 
यावर्षी मुग व उडिदाची आवक चांगली झाली आहे. भाव देखील मागील वर्षीच्या तुलनेत चांगले आहेत. 
- महादेव मठपती, आडत व्यापारी, मार्केट यार्ड सोलापूर 

यावर्षी राजस्थानला उडिदाची मागणी 
चांगले उतारे व आवक चांगली असल्याने हंगामाची सुरवात झाली आहे. यावर्षी राजस्थानहून पहिल्यांदाच उडिदाची मागणी आहे. 
- गुरुराज यादवाड, आडत व्यापारी सोलापूर 

उघाड मिळाल्याने पिके चांगली 
पावसाने उघाड दिल्याने काढणी आटोपल्याने मुग व उडिद बाजारात विक्रीसाठी लवकर आले आहेत. 
- माणिक संगाक्का रघोजी, आडत व्यापारी सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com