
An elderly disabled woman from Dhondewadi tearfully appeals to authorities for help; a story of struggle and survival in rural Maharashtra.
Sakal
पंढरपूर : ‘साहेब.. .तुम्हीच माझे माय बाप आहात, मला कोणी तरी मदत करा हो...’ अशी आर्त हाक धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील एक वयोवृद्ध दिव्यांग महिला अनेकांना देत आहे. अनुसया किसन जाधव (वय ८०) असे या निराधार महिलेचे नाव आहे. डोक्यावरच्या गळक्या घरातच तिला सध्या मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. तिला मदतीची गरज आहे.