Solapur News:'धुबधुबी तलावात बुडून जेऊर येथील तरुणाचा मृत्यू'; अंदाज न आल्याने सांडव्याच्या पाण्यात बुडाला

Tragic Death: रविवारी सूर्यकांत हा अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावातील बसवराज हेळवे यांच्या चुलत साडूचा मुलगा सचिन हणमंत हेळवे व राजकुमार लखप्पा हेळवे यांच्याबरोबर येथील धुबधुबी तलावात पोहायला गेला होता. तेथे सूर्यकांतला सांडव्याच्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो सांडव्याच्या पाण्यात बुडाला.
"Emergency teams at Dhubdhubi Lake after the tragic drowning of a Jeur youth due to sudden water overflow."
"Emergency teams at Dhubdhubi Lake after the tragic drowning of a Jeur youth due to sudden water overflow."Sakal
Updated on

अक्कलकोट: तालुक्यातील जेऊर येथील धुबधुबी तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सूर्यकांत ऊर्फ सुरेश बसवराज हेळवे (वय २६, रा. जेऊर, ता. अक्कलकोट) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. याची खबर बसवराज हेळवे (वय ५५, रा. करजगी, ता. अक्कलकोट) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com