

Drowning Incident
sakal
सांगोला : सांगोला तालुक्यातील सावे येथील एक तरुण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. बंडू आत्माराम गावडे (वय ३५, रा. गावडे वस्ती, सावे, ता. सांगोला) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी माण नदीपात्रात गावडे वस्ती, सावे (ता. सांगोला) येथे घडली आहे.