

Solapur Accident
सोलापूर: मध्यप्रदेशातून विजयपूरमार्गे ब्रजेश सुखदेव कासदे (वय २२, रा. धनवार, मध्यप्रदेश) हा सोलापुरात आला होता. रविवारी (ता. ३०) सकाळी साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुना पूना नाक्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने संगम बेकरीसमोर त्या तरुणाला जोरात धडक दिली. त्याच्या डोक्यावर बसचे चाक गेल्याने ब्रजेशचा जागीच मृत्यू झाला.