

Solapur Crime
Sakal
सोलापूर : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेळगी परिसरातील हुसेनबाशा अ.रजाक सय्यद (वय ४६) या टेलर व्यावसायिकास अटक केली आहे. त्याच्याकडे एक बंदूक व दोन गोळ्या (काडतूस) सापडल्या आहेत. त्याने हौसेसाठी बंदूक घेतली होती.