Solapur News : भंगार विक्रीतून रेल्वेला २४८ कोटी रुपये; ‘शून्य भंगार’ उपक्रम, सोलापूर विभागाला २० कोटींचा महसूल

नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वेने १८ हजार २२९ दशलक्ष टन भंगाराची विक्री
zero scrap scheme railway scrap revenue of 248 cr solapur division get 20 cr revenue
zero scrap scheme railway scrap revenue of 248 cr solapur division get 20 cr revenuesakal

Solapur News : मध्य रेल्वेच्यावतीने सध्या ‘शून्य भंगार’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून रेल्वेला तब्बल २४८ कोटी रुपये मिळाले आहेत. सोलापूर विभागातून २० कोटी ७० लाखांचा महसूल मिळाला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वेने १८ हजार २२९ दशलक्ष टन भंगाराची विक्री केली आहे.

वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स/रेल्वे डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

मध्य रेल्वेने काढलेल्या भंगारात विकलेल्या साहित्यामध्ये १३ लोकोमोटिव्ह, २१६ डबे आणि १२४ वॅगन्स यांचा समावेश आहे. भुसावळ विभागातील २० किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाइनसह इतर साहित्याची विक्री करण्यात आली आहे.

zero scrap scheme railway scrap revenue of 248 cr solapur division get 20 cr revenue
Solapur News : दोन हॉटेल चालकांसह नऊ मद्यपींना ५४ हजारांचा दंड

त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रूपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे हा ‘शून्य-भंगार’ उपक्रमाचा भाग आहे. मध्य रेल्वे साहित्य व्यवस्थापन विभाग कर्मचाऱ्यांसाठी निवासांचे बांधकाम सुरू करण्यासाठी पडीक वास्तूंची विल्हेवाट लावण्यात देखील रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत नागपूर विभागातील ४८९, सोलापूर विभागातील ३८५, मुंबई विभागातील ३०५, भुसावळ विभागात २५८ आणि पुणे विभागातील ५६ अशी एकूण १ हजार ४९३ निवासी घरे पडीक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

zero scrap scheme railway scrap revenue of 248 cr solapur division get 20 cr revenue
Solapur News : बाजार समितीत कांद्याची ‘बेहिशेबी’ आवक

यापैकी १ हजार २२२ वास्तू पाडण्यासाठी व जागा साफ करण्यासाठी ठेकेदारांना काम देण्यात आले आहे. नागपूर विभागातील ४३१, सोलापूर विभागातील ३८४, मुंबई विभागातील ३०५, भुसावळ विभागातील ४६ आणि पुणे विभागातील ५६ जणांचा यामध्ये समावेश आहे.

भुसावळ विभागाला सर्वाधिक ४९ कोटींचा महसूल

रेल्वेने विक्री केलेल्या भंगारातून भुसावळ विभागाला ४९ कोटी २० लाख, माटुंगा आगाराला ४० कोटी ५८ लाख, मुंबई विभागाला ३६ लाख ३९ हजार, भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेडला २३ कोटी ६७ लाख, नागपूर विभागाला २२ कोटी ३२ लाख, पुणे विभागाला २२ कोटी ३१ लाख, सोलापूर विभागाला २० कोटी ७० लाख, परळ, हाजी बंदर-शिवडी, मनमाड व करी रोड यांनी एकत्रितपणे विक्री केलेल्या भंगारातून त्यांना ३२ कोटी ९० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

विभागनिहाय विकलेले भंगार (दशलक्ष टनामध्ये)

  • भुसावळ : ७ हजार ९९४

  • मुंबई : ४ हजार १४४

  • नागपूर : ३ हजार ७४८

  • सोलापूर : १ हजार २८०

  • पुणे : १ हजार ६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com