काँग्रेस-शिवसेना लढणार एकत्र? जागा वाटपात राष्ट्रवादीला घ्यावे लागणार एक पाऊल मागे

इच्छुकांची संख्या पाहता सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. पण, जागा वाटपात ताठर भूमिका न घेता सर्वच पक्षांना एक पाऊल मागे घेतल्यास आघाडी होऊ शकते. अन्यथा, जो पक्ष एक पाऊल मागे घेणार नाही, त्याला सोडून उर्वरित दोन्ही पक्ष एकत्र लढू शकतात, अशी शक्यता आहे.
politics
politicssakal

सोलापूर : प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण निश्चिती देखील झाल्याने बऱ्याच प्रभागांमधील लढती स्पष्ट झाल्या आहेत. आता इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करायला सुरवात केली असून, इच्छुकांची संख्या पाहता सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. पण, जागा वाटपात ताठर भूमिका न घेता सर्वच पक्षांना एक पाऊल मागे घेतल्यास आघाडी होऊ शकते. अन्यथा, जो पक्ष एक पाऊल मागे घेणार नाही, त्याला सोडून उर्वरित दोन्ही पक्ष एकत्र लढू शकतात, अशी शक्यता आहे.

politics
८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत! लसीकरणामुळे मृत्यूदर घटला; ७.२५ कोटी व्यक्ती सुरक्षित

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झाली. पण, आमदारांना पुरेसा निधी मिळत नाही, निधी देताना भेदभाव केला जातो, अशी धुसफूस शिवसेना व काँग्रेसमध्ये असून, त्याची प्रचिती राज्यसभा निवडणुकीत सर्वांनाच आली. दुसरीकडे, शिवसेना आणि काँग्रेसमधील नाराजांना राष्ट्रवादीने पक्षात प्रवेश दिला असून वास्तविक पाहता आघाडी झाल्यानंतर तसे अपेक्षित नव्हते. राष्ट्रवादीची ताकद दोन्ही पक्षांच्या तुलनेत वाढल्याचे बोलले जात आहे. सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख, काँग्रेसचे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे राष्ट्रवादीत येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळाची भाषा करून काँग्रेस व शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पण, कोणत्या तरी एका पक्षाला सोबत घेतल्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन करणे कठीण मानले जात आहे.

politics
ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी

शिवसेना कोणत्याही व्यक्तीवर नाही तर विचारांवर चालणारा पक्ष

शिवसेना हा महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष असून, शिवसेना कोणत्याही व्यक्तीवर नाही तर विचारांवर चालणारा पक्ष आहे. एकजण सोडून गेला म्हणून पक्षाला काही फरक पडत नाही. विद्यमान २२ जागा सोडून उर्वरित जागांमध्ये शिवसेनेला समान जागा मिळाल्या तर आघाडी होऊ शकते.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

politics
राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

शिवसेना सोबत आल्यास त्यांच्याबरोबर लढवू निवडणूक

महापालिकेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक असून, त्यांची नेतेमंडळी त्या प्रमाणात जागांची मागणी करतील अशी अपेक्षा आहे. आमची ताकद असलेल्या प्रभागांवर आमचा कायम दावा असेल. सन्मानाने आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आम्ही स्वबळावर किंवा शिवसेना सोबत आल्यास त्यांच्याबरोबर निवडणूक लढवू.

- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस

politics
ओबीसींना मिळणार आरक्षण? मतदार संख्येचा अहवाल आज पाठवणार

आघाडीचा अधिकार स्थानिक नेत्यांनाच

जागा वाटपात तडजोड होऊन आघाडी होण्यास काहीही अडचणी नाहीत; मात्र आजवर कायम विरोधात लढणारी शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सोबत आहे. तिन्ही पक्षांची ताकद बहुतेक प्रभागांमध्ये एकसारखीच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणता पक्ष एक पाऊल मागे घेणार, यावर आघाडीचा निर्णय अवलंबून असणार आहे. तत्पूर्वी, तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना तेथील राजकीय परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेता येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याच भूमिकेवर सर्व काही राजकीय समीकरणे अवलंबून असतील, असे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com