सोलापुरातील शौर्यपदकधारकांच्या  मालमत्ता "टॅक्‍स फ्री'

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

देशासाठी प्राणांची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शौर्यपदक मिळवलेले सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या त्यांच्या नावावर असलेल्या एका मिळकतींवर सवलत देण्याचा निर्णय शासनाने 5 एप्रिल 2016 रोजी घेतला होता. त्यासंदर्भात 7 एप्रिल रोजी शुद्धीपत्रक काढून एका मिळकतीवर हा शब्द वगळण्यात आला. त्यामुळे शौर्यपदकधारक सैनिक आणि माजी सैनिकाच्या विधवांना सर्व मिळकतींच्या करातून सवलत मिळणार आहे. 

सोलापूर- संरक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवा यांच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तांना मिळकत करातून सवलत देण्यात आली आहे. संबंधितांना फक्त पाणीपट्टी आणि शिक्षण कर भरावा लागेल. करमाफीस पात्र झालेल्या लाभार्थींना जिल्हा सैनिक अधिकाऱ्याचे पत्र द्यावे लागेल. सभेच्या ठरावाची अंमलबजावणी महापालिकेने केली आहे.

देशासाठी प्राणांची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शौर्यपदक मिळवलेले सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या त्यांच्या नावावर असलेल्या एका मिळकतींवर सवलत देण्याचा निर्णय शासनाने 5 एप्रिल 2016 रोजी घेतला होता. त्यासंदर्भात 7 एप्रिल रोजी शुद्धीपत्रक काढून एका मिळकतीवर हा शब्द वगळण्यात आला. त्यामुळे शौर्यपदकधारक सैनिक आणि माजी सैनिकाच्या विधवांना सर्व मिळकतींच्या करातून सवलत मिळणार आहे. 

शासनाने 5 एप्रिल व 7 एप्रिल 2016 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या सर्व मिळकतीमध्ये सवलत द्यावी लागेल. केवळ पाणीपट्टी आणि शिक्षण कर वसूल करता येईल. मात्र, त्यासाठी संबंधितांनी शासन आदेशानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असा अभिप्राय ऍड. विजय मराठे यांनी दिला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. 

ही सवलत सरसकट माजी सैनिकांना नाही. शौर्यपदक मिळाल्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे पत्र जोडणाऱ्या माजी सैनिकासच ही सवलत दिली जाईल. 
- आर. पी. गायकवाड, कर आकारणी व कर संकलन प्रमुख

Web Title: Solapurs Shaurya medal winners property tax free