पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात मोपेड वरील लष्करी जवान जागीच ठार

प्रकाश हा लष्करी जवान असून तो कौटुंबिक कारणानिमित्त २९ मे रोजी सुट्टीवर गावी आला होता.
soldier killed in accident on Pune-Bangalore National Highway belgaum
soldier killed in accident on Pune-Bangalore National Highway belgaumsakal

बेळगाव : मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरील मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोपेड वरील लष्करी जवान जागीच ठार झाला. गुरुवार (ता.२) दुपारी ३.३० च्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हालगा गावानजिक हा अपघात घडला. प्रकाश मडिवाळप्पा संगोळी (वय २८, रा. होसुर ता. सौंदती) असे झालेल्या जवानाचे नाव असून अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. प्रकाश हा लष्करी जवान असून तो कौटुंबिक कारणानिमित्त २९ मे रोजी सुट्टीवर गावी आला होता. काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान केए २२ एचके २४०६ ॲक्टिवा मोपेडवरून तो बेळगावकडून हिरेबागेवाडीकडे जात होता.

त्यावेळी त्याच्यामागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने हलगा येथील मंजुनाथ राईस मिल जवळ ॲक्टिवाला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे प्रकाश रस्त्यावर कोसळला. त्याच्या अंगावरून वाहन घालून चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी झालेल्या अपघातात प्रकाशला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रकाश हा लष्करी जवान असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर आज मृतदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातग्रस्त वाहनाचा शोध चालविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com