बॅंक व्यवस्थापकाच्या घरातून 10 तोळे दागिन्यांची चोरी 

परशुराम कोकणे
सोमवार, 26 मार्च 2018

सोलापूर - मोरया सोसायटीत राहणाऱ्या बॅंक व्यवस्थापक महिलेच्या घरातील लाकडी शोकेसमधून चोरट्याने सुमारे 2 लाख 18 हजार किमतीचे 10 तोळे दागिने चोरुन नेले. ही घटना रविवारी पहाटे घडली. 

सोलापूर - मोरया सोसायटीत राहणाऱ्या बॅंक व्यवस्थापक महिलेच्या घरातील लाकडी शोकेसमधून चोरट्याने सुमारे 2 लाख 18 हजार किमतीचे 10 तोळे दागिने चोरुन नेले. ही घटना रविवारी पहाटे घडली. 

रिहाना साहेबालाल तांबोळी (वय 57, रा.मोरया सोसायटी आधार हॉस्पीटलच्या बाजूस) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांबोळी या बॅंकेत व्यवस्थापक आहे. तर त्यांची मुले डॉक्‍टर आहेत. त्यांचे घर दोन मजल्याचे आहे. दुसऱ्या मजल्यावरील घरास कूलूप लावून सर्वजण खालच्या मजल्यावर झोपले होते. चोरट्यानी दुसऱ्या मजल्यावरील घरात प्रवेश केला. लाकडी शोकेशमधून चोरट्याने 60 ग्रॅम वजनाच्या बांगड्या, 30 रॅम वजनाची बोरमाळ, 4 रॅम वजनाचे झुमके, अंगठ्या, कुंदनहार व घड्याळ असा सुमारे 2 लाख 18 हजारांचा ऐवज चोरुन नेला. 

पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस निरीक्षक अंकुशकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्हाची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोसई कजागवाले करत आहेत.

Web Title: Solhapur News robbery incidence in Bank Manager Home