videoरद्दीवाल्याच्या मुलाने केलं आयुष्याचं सोनं

The son of a scrap businessman ca.
The son of a scrap businessman ca.

नगर : "पापा कहते हैं बडा नाम करेगा' हे गीत नव्वदीच्या दशकात चांगलेच गाजले होते. त्याप्रमाणे नगरमधील एका रद्दी व्यावसायिकाच्या मुलाने जिद्दीने "बडा नाम' करून दाखविले. नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्‌स (सीए) परीक्षेत अक्षय लक्ष्मीकांत चुत्तरने यश मिळविले आहे.

लक्ष्मीकांत चुत्तर 1985पासून रद्दीचा व्यवसाय करीत आहेत. दुकान व घर एकत्र आहे. चुत्तर यांचे शिक्षण दहावीपर्यंतचे, तर त्यांच्या पत्नी एम. कॉम झालेल्या. या कुटुंबाची आर्थिक स्थितीही बेताची आहे. अक्षयचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले.

12वीला वाणिज्य शाखेत 67 टक्‍केच

दहावीला त्याला चांगले गुण मिळाले. मात्र, अक्षयचे मामा राजेश बागमार यांच्याप्रमाणे गरिबीतून शिकून अक्षयने सीए व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. अक्षयला 12वीला वाणिज्य शाखेत 67 टक्‍केच गुण मिळाले. मात्र, अकाउंट्‌समध्ये त्याने 90पेक्षाही जास्त गुण मिळविले. त्यामुळे त्याने सीए होण्याचे निश्‍चित केले.

सारडा महाविद्यालयातूनच पूर्ण

पदवीचे शिक्षण त्याने पेमराज सारडा महाविद्यालयातूनच पूर्ण केले; पण पुरेशी जागा नसल्याने त्याने देसरडा भंडारी क्‍लास व सीए भवनाच्या ग्रंथालयात बसून अभ्यास केला. रात्रीच्या वेळी शांतता असते म्हणून त्याने रात्री अभ्यास, सकाळी झोप व दुपारी वडिलांना रद्दी व्यवसायात मदत, असा दिनक्रम सुरू केला. 

अंतिम परीक्षा अनुत्तीर्ण
अक्षय सीएच्या अंतिम परीक्षेला असताना त्याच्या आजीला कर्करोग झाला. त्यातच त्यांचे काही दिवसांनी निधन झाले. या तणावामुळे अक्षयला अंतिम परीक्षेची तयारी करता आली नाही. आजी गेल्याच्या मानसिकतेतच तो अंतिम परीक्षा अनुत्तीर्ण झाला. मात्र, नंतर त्याने पुन्हा स्वतःला सावरत अभ्यास सुरू केला. त्याचे मामा सीए राजेश बागमार यांनी त्याला पुस्तके देऊन मार्गदर्शन केले. अक्षयने पुन्हा अंतिम परीक्षा दिली आणि यश खेचून आणले. 

अक्षयने सीए पी. एम. भंडारी व सीए मुकेश कानकिया यांच्याकडे आर्टिकलशिप पूर्ण केली. त्याला सीए संदीप देसर्डा व सीए प्रसाद भंडारी यांचे मार्गदर्शन मिळाले. मित्र वैभव कासवा, अभिषेक मेहेर, केतन कोठारी यांचे सहकार्य मिळाले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com