एमपीएससी परीक्षेत सोलापुरातील सुपुत्रांचा झेंडा

अक्षय गुंड
गुरुवार, 31 मे 2018

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी २०१७ मध्ये  मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी पुन्हा एकदा स्पर्धा परिक्षेत सोलापूरचा झेंडा रोवला आहे.

पिलीव (ता. माळशिरस) चे सुपुत्र अजयकुमार नष्टे हे राज्यात चौथ्या क्रंमाकाने उपजिल्हाधिकारी पदी उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या उपमुख्यकार्यकारी या पदावर कार्यरत आहेत. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर चे प्रमोद कुदळे यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. सध्या ते उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. अकलूज येथील मनिषा कांबळे यांची सहायक विक्रीकर आयुक्त या पदावर निवड झाली आहे.

करमाळा तालुक्यातील साडे येथील अमोल आमले यांची वित्त व लेखा अधिकारी गट 'अ' या पदी निवड झाली आहे. सध्या ते सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर रावगाव येथील सुशांत शिंदे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. बार्शी तालुक्यातील किशोर मिरगणे यांची सहायक विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव येथील सुजितकुमार क्षीरसागर यांची पोलिस उपअधीक्षक पदी निवड तर मानेगावचे संतोष नागटिळक यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी निवड झाली आहे.

Web Title: sonapure's son's flag in mpsc exam