जिल्ह्यात बेकायदा सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मिरज - म्हैसाळमध्ये उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणाचा धडा घेत जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व अनोंदणीकृत नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. याबाबतचे फर्मान तालुका अधिकाऱ्यांना पाठवले असून, 27 मार्चपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. 

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी संयुक्त आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे, की स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे प्रकरण घडल्याने जिल्हाभर तपासणी मोहीम राबवली जावी. नोंदणी न करताच असे उद्योग सुरू असणाऱ्यांची माहिती घ्यावी. सर्वतोपरी तपासणी करून सुस्पष्ट अहवाल 27 मार्चपर्यंत सादर करावा. माहिती घ्यावी लागणाऱ्या मुद्द्यांची सूचीही सोबत जोडली आहे. सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका ग्रामीण रुग्णालये, आरोग्याधिकारी, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना आदेश जारी करण्यात आला आहे. 

Web Title: Sonography centers continue to investigate campaign