सांगली : सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

खाद्यतेल दरवाढीची पार्श्‍वभूमी ः खरिपासाठी मशागतींची धावाधाव
सोयाबीनचे पीक.
सोयाबीनचे पीक. सकाळ

सांगली - यंदा मॉन्सून लवकर येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेली दोन दिवस झालेल्या पावसाने खरिपासाठी मशागती पूर्ण होतील. येत्या पंधरवड्यात पेरणीसाठी शेतकरी पुढे येतील. खाद्यतेल दरातील तेजीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात खरीप घेणाऱ्या गावांची संख्या ६३३ असून क्षेत्र ३ लाख ५६ हजार ७५४ हेक्टर आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात २ लाख ७५ हजार ३१३ हेक्टरवर पेरा झाला होता. जिल्ह्याचे सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४७ हजार १०१ हेक्टर आहे. त्यापैकी सोयाबीनची पेरणी ५१ हजार ७५५ हेक्टरवर झाली होती. गतवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात पाच हजार हेक्टरने वाढ झाली होती. परंतु महापुरामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. खते आणि बियाणे देखील उपलब्ध केले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात सोयाबीनसह अन्य पिकांची प्रात्यक्षिके घेऊन बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांची उगवणक्षमता समजण्यास मदत झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले होते. गेली दोन दिवस चांगला पाऊसही झाला; त्यात हवामान खात्याने मॉन्सून लवकर सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी केली आहे. आता पावसाची प्रतीक्षा करू लागला असून येत्या पंधरवड्यात पेरणीसाठी शेतकरी पुढे येतील. यंदाच्या खरीप हंगामात क्षेत्रही वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com