‘एसपी’ बनले ‘बेस्ट शूटर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

सांगली - औरंगाबाद येथे झालेल्या २९ व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय सावंत यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य पदकासह ‘बेस्ट शूटर’चा बहुमान मिळाला. स्पर्धेत १४० पैकी १३२ गुण मिळवत स्वत:चाच ११९ गुणांचा ‘विक्रम’ मोडीत काढला.

सांगली - औरंगाबाद येथे झालेल्या २९ व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय सावंत यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य पदकासह ‘बेस्ट शूटर’चा बहुमान मिळाला. स्पर्धेत १४० पैकी १३२ गुण मिळवत स्वत:चाच ११९ गुणांचा ‘विक्रम’ मोडीत काढला.

औरंगाबाद येथे १५ मीटर अंतरावरील ग्रुपिंग फायर प्रकारात श्री. शिंदे यांनी २० पैकी २० गुण मिळवत रौप्य पदक मिळवले. १५ मीटर अंतरावरून ॲप्लिकेशन प्रकारात ६० पैकी ५९ गुणांसह सुवर्णपदक व २५  मीटर अंतरावरील रॅपिड फायर प्रकारात ६० पैकी ५३ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. शूटिंग प्रकारात १४० पैकी १३२ गुणांसह ‘बेस्ट शूटर’चा बहुमान त्यांनी मिळवला. अशी कामगिरी करून त्यांनी स्पर्धेतील यापूर्वीचे स्वत:चे ११९ गुणांचे रेकॉर्ड मोडले.

पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते व विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत श्री. शिंदे यांना चषक प्रदान करण्यात आला. 

श्री. शिंदे यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त भागात साडे तीन वर्षे सेवा केली आहे. एके ४७ रायफल व ग्रेनेडसह जंगलात नक्षलविरोधी अभियानही राबवले. एका ट्रॅपमध्ये त्यांनी रात्री नक्षलवादीही पकडला होता. फायरिंग हे त्यांचे ‘पॅशन’ आहे. मुंबई येथे गुंडाविरोधात ‘काऊंटर ऑर्गनाईज्ड क्राईम सिंडीकेट’ राबवताना नऊवेळा चकमक झाली. त्यात सर्व गुंड चकमकीत मारले गेले. २०१२ ते २०१५ पर्यंत फोर्सवनमध्ये ते अधीक्षक होते. कायदा व सुव्यवस्था राखताना दंगेखोर व समाजकंटकांना नियंत्रित करण्यासाठी स्वत: तीन वेळा फायरिंग केले.

Web Title: sp best shooter