बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या दहावी निकाल वाढीसाठी विशेष उपक्रम राबविणार

नुतन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या दहावी निकाल वाढीसाठी विशेष उपक्रम राबविणार

बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावीचा निकाल वाढावा यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जातील अशी माहिती नुतन जिल्हा शिक्षणाधिकारी(Education Officer) बसवराज नलतवाड यांनी दिली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी पद स्वीकारल्यानंतर शनिवारी नलतवाड यांनी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सकाळशी संवाद साधताना कोरोनाचे संकट असले तरी शाळा सुरळीतपणे सुरू राहाव्यात यासाठी सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमावलीचे शाळांनी पालन करणे आवश्यक आहे. तसेच सरकारकडून येणाऱ्या काळात ज्या सूचना केल्या जातील त्या प्रमाणे निर्णय घेतला जाईल.(Special activities will be implemented to increase the tenth result of Education in belgaum District)

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या दहावी निकाल वाढीसाठी विशेष उपक्रम राबविणार
''भाजपच्या रॅलीत सरकारी कर्मचारी अन् तिकीट मागणाऱ्यांची गर्दी''

शैक्षणिक जिल्ह्याचा दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून विविध विषयांच्या कार्यशाळा व इतर कार्यक्रम हाती घेऊन मार्गदर्शन केले जाणार असून विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कार्यालयात दिवसभर शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची व शिक्षकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पहावयास मिळत होती. नलतवाड यांनी यापूर्वी शहरासह बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे शैक्षणिक जिल्ह्यातील समस्यांची त्यांना जाणीव असल्याने शिक्षकांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होईल असे मत शिक्षकांमधून व्यक्त होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com