सोलापुरात थर्माकोलच्या आरासावर विशेष लक्ष 

Special attention to the thermocoul ban in Solapur
Special attention to the thermocoul ban in Solapur

सोलापूर : श्री गणेशोत्सव काळात थर्माकोलपासून बनविण्यात आलेले साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका अन्न व परवाना विभागाच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, फुल विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना कॅरीबॅगचा पुरवठा करणाऱ्या फेरीवाल्याकडून दीडशे किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.

थर्माकोलपासून मंदीर किंवा आरासाचे साहित्य मोठ्या प्रमाणात तयार केले जाते. त्याला मागणीही खूप असते. मात्र प्लास्टिकबरोबरच थर्माकोलवरही शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना थर्माकोलपासून बनविण्यात आलेले मखर किंवा आरासाचे साहित्य विक्रीसाठी ठेवता येणार नाही. या दुकानांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. विभीगाय कार्यालयानुसार अधिकारी व कर्मचारी नियुक्त असतील. त्यांच्याकडून कोणत्याही क्षणी अचानकपणे तपासणी केली जाणार आहे. थर्माकोलचे मखर किंवा साहित्य दिसून आल्यास जागेवर पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.

मारुती, सात रस्ता, मार्केट यार्ड या परिसरातील फुल विक्रेत्यांना कॅरीबॅग पुरविल्या जात होत्या. त्या जप्त करण्यात आल्याच, शिवाय मुख्य पुरवठादार कोण आहे याचा शोध घेतला. त्यावेळी एक फेरीवाला सायकवरून गुपचूप या कॅरीबॅग नेत असल्याचे दिसून आले. सकाळी साडेसातच्या सुमारास त्याला मधलामारुती परिसरात ताब्यात घेतले व त्याच्याकडील सुमारे दीडशे किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. महापालिका अन्न व परवाना अधीक्षक ए. के. आराध्ये, निरीक्षक केदार गोटे, श्रीराम कुलकर्णी, केदार गोटे, सूर्यकांत लोखंडे, भारत रोडगे व दत्ता गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आकडे बोलतात... 

तपासलेली दुकाने : 2825 

दंड झालेले व्यापारी : 149 

वसूल झालेला दंड : 7.55 लाख रुपये

जप्त केलेले प्लास्टिक : 2068 किलो 

नोटीस दिलेले दुकानदार : 863 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com