सोलापूऱ - महापालिकेतील विशेष समित्या बनणार "प्रभावशाली' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सोलापूर : महापालिकेतील विशेष समित्या आता खऱ्या अर्थाने प्रभावशाली बनणार आहेत. समित्यांचे सभापती व अधिकाऱ्यांच्या बैठकीत या समित्यांची कार्यपद्धती व जबाबदारी निश्‍चित करण्याबाबत चर्चा झाली. 

आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महिला बालकल्याण समितीच्या रामेश्‍वरी बिर्रु, स्थापत्य समितीचे गुरुशांत धुत्तरगावकर, शहर सुधारणेच्या शालन शिंदे, मंड्या उद्यान समितीच्या कुमुद अंकाराम, विधी समितीचे विनायक कोंड्याल, आरोग्य व वैद्यकीय समितीच्या वरलक्ष्मी पुरुड, कामगार व समाज कल्याण समितीचे रवी 
कैय्यावाले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

या सात विशेष समित्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या ठरविण्यात आल्या असून नंतरच्या काळात याचा अधिक विचार करण्यात न आल्याने समित्या नावापुरत्या राहिल्या आहेत. वर्षभरातून बैठकाही होत नाहीत. त्यामुळे या समित्या अधिक प्रभावशाली बनविण्याच्या दृष्टीने बैठक बोलावल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. खातेप्रमुख प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाहीत म्हणून प्रत्येक समितीला समन्वयाकरिता एक नोडल ऑफिसर नेमण्याचा निर्णय झाला. 

समितीच्या सदस्यांना देखील नेमक्‍या कार्यक्षेत्राची माहिती नसते. आजच्या बैठकीसाठी झेरॉक्‍स मारून जी माहिती पुरविण्यात आलीय तशाच पद्धतीने समितीचे हक्क/अधिकार व जबाबदारी यांची माहिती असणारी छोटी पुस्तिका छापून ती प्रत्येक समिती सदस्याला देण्यात यावी, अशी मागणी श्री. धुत्तरगावकर यांनी केली. नव्याने कार्यपद्धती निश्‍चित केल्यावर सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन अशी पुस्तिका देता येतील, असे आयुक्तांनी सांगितले. 

प्रशासनाच्या कारभारावर आयुक्तांची आगपाखड 
एकेक समित्यांवर चर्चा सुरू झाली. स्थापत्य समितीविषयीच्या सूचना आल्या, आयुक्तांनी काही आदेश दिले. त्यांच्या लक्षात आलं की, बैठकीत कुणीच मुद्दे लिहून घेत नाहीय. याबाबत त्यांनी नगरसचिव पी. पी. दंतकाळे यांना जाब विचारला. त्या वेळी दंतकाळे यांनी दिलगिरी व्यक्त केली व स्वतः लिहून घेतो असे सांगितले. ते कागदाच्या तुकड्यावर लिहून घेताहेत पाहिल्यावर आयुक्त संतापले. बैठकीला येताना डायरीसुद्धा जवळ बाळगता येत नसेल तर बैठका बोलाविताच कशाला? आम्हाला आणि या सदस्यांना कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे आलोय का?, असे विचारत दंतकाळेंना चांगलेच झापले. 

Web Title: special committees become impactful in solpaur municipal corporation