esakal | स्पेशल रेल्वे धावणार २ जानेवारीपर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

Special train will run till January 2

४ डिसेंबरपासून आणखी ३१ रेल्वे सेवेत; प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय

स्पेशल रेल्वे धावणार २ जानेवारीपर्यंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : प्रवाशांचा विचार करून नैॡत्य रेल्वेने २० ऑक्‍टोबरपासून ५८ फेस्टिव्हल रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यातील काही रेल्वे अद्यापही धावत आहेत. मात्र, ज्या रेल्वेचा महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा रेल्वे महिनाभरासाठी पुन्हा रुळावर धावणार आहेत. ४ डिसेंबरपासून ते २ जानेवारीपर्यंत ३१ रेल्वे पुन्हा सुरू होत आहेत. यामध्ये डेली, विकली, बाय बिकली या रेल्वेचा समावेश आहे.


यशवंतपूर कोरबा-रेल्वे ४ ते २५ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. कोरबा-यशवंतपूर ६ ते २७ डिसेंबर, म्हैसूर-भुवनेश्वर १ ते ३१ डिसेंबर, भुवनेश्वर-म्हैसूर ३ डिसेंबर ते २ जानेवारी, यशवंतपूर-अहमदाबाद ६ ते २७ डिसेंबर, अहमदाबाद-यशवंतपूर ८ ते २९ डिसेंबर, बंगळूर-गांधीधाम ५ ते २६ डिसेंबर, गांधीधाम-बंगळूर ८ ते २९ डिसेंबर, बंगळूर-जोधपूर २ ते ३० डिसेंबर, जोधपूर-बंगळूर ५ डिसेंबर ते २ जानेवारी, म्हैसूर-अजमेर १ ते ३१ डिसेंबर, अजमेर-म्हैसूर ४ डिसेंबर ते ३ जानेवारी, यशवंतपूर-भागलपूर ५ ते २६ डिसेंबर, भागलपूर-यशवंतपूर ९ ते ३० डिसेंबर, यशवंतपूर-लखनऊ ७ ते २८ डिसेंबर, लखनऊ-यशवंतपूर १० ते ३१ डिसेंबर, यशवंतपूर-लखनऊ २ ते ३० डिसेंबर, बंगळूर-चेन्नई १ ते ३१ डिसेंबर, चेन्नई-बंगळूर १ ते ३१ डिसेंबर, बंगळूर-चेन्नई १ ते ३१ डिसेंबर, चेन्नई-बंगळूर २ डिसेंबर ते १ जानेवारी, म्हैसूर-मैलादुथराई १ ते ३१ डिसेंबर, मैलादुथराई-म्हैसूर २ डिसेंबर ते १ जानेवारी, म्हैसूर-ट्यूटीकोरीन १ ते ३१ डिसेंबर, ट्यूटीकोरीन-म्हैसूर २ डिसेंबर ते १ जानेवारी, बंगळूर-कन्याकुमारी १ ते ३१ डिसेंबर, कन्याकुमारी-बंगळूर ३ डिसेंबर ते २ जानेवारी, भुवनेश्वर-बंगळूर ६ ते २७ डिसेंबर, बंगळूर ते भुवनेश्वर ८ ते २९ डिसेंबर या दरम्यान रेल्वे धावणार आहेत. 

हेही वाचा- वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा -

२७ ऑक्‍टोबरपासून १ डिसेबरपर्यंत रेल्वे 
दसरा व दिवाळीदरम्यान ५२ स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातील काही ट्रेन अजूनही धावत आहेत. यामध्ये अहमदाबाद-यशवंतपूर २७ ऑक्‍टोबर ते १ डिसेंबर, गांधीधाम-बंगळूर २७ ऑक्‍टोबर ते १ डिसेंबर, म्हैसूर-धारवाड २१ ऑक्‍टोबर ते १ डिसेंबर, धारवाड-म्हैसूर २० ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबर, जोधपूर-बंगळूर २४ ऑक्‍टोबर ते ३ डिसेंबर, सिकंदराबाद-हुबळी २१ ऑक्‍टोबर ते १ डिसेंबरपर्यंत धावणार आहेत.

संपादन- अर्चना बनगे

loading image